भर पावसात आषाढी पुर्वसंध्येला वारकरी बंधू – भगिनी ची नगर प्रदक्षिणा संपन्न
कोल्हापूर/प्रतिनिधी : प्रति पंढरपूर नंदवाळ कडे रविवारी आषाढी वारी निमित्त जाणारे कोल्हापूर पंचक्रोशीतील विविध भाविक आज सायंकाळी मंगळवार पेठेतील विठ्ठल मंदिराजवळ जमा झाले तिथे विधिवत आरतीनंतर बिन खावी गणेश मंदिर – महाद्वार रोड भवानी मंडप -मिरजकर तिकटी मार्गे टिंबर मार्केट पर्यंत नगर प्रदिक्षणा काढण्यात आली . भर पावसात निघालेले या दींडीत वारकरी बंधू – भगिनी उत्साहाने सहभागी झाले होते. सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास विठ्ठल मंदिरामध्ये दिंडी प्रमुख आनंदराव लाड महाराज यांच्यासह चोपदार भगवान शिवले तसेच एमपी पाटील कावणीकर यांच्यासह श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा फक्त मंडळाचे बाळासाहेब पवार दीपक गौड आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आरती होऊन ही पालखी दींडीने मार्गस्थ झाली .या दींडीत कांडगांव येथून आलेल्या ११ बैलगाडयासह रांगोळे परिवाराचे दोन माऊली अश्व तसेच हुपरी हून आलेली पालखी तसेच महिला भजनी मंडळे उत्साहात टाळ मृदंग – तुळस सह सहभागी झाले होते . विसावा ठिकाणी दीडी प्र मुख हभप लाड महाराज तसेच एम. पी .पाटील यांची प्रवचने झाली . यावेळी वालावलकर हॉस्पीटल वतीने संतोष कुलकर्णी समन्वयाने डॉ. विरेंद्र वणकुद्रे – डॉ . परेश कुलकर्णी – डॉ. जयश्री शेट्टी यांनी वारकरी बंधू – भगिनी ची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधे दिली तर सर्वाची प्रसादाची व्यवस्था श्रीमती लिलाबाई बाळासाहेब सासने परिवाराने केली होती. रविवारी सकाळी दिंडीचे नंदवाळकडे प्रयाण : खंडोबा तालीम येथे बेल , भंडाऱ्याने स्वागत आषाढी दिनी रविवार दि . १० जुलै रोजी सकाळी ७.३० वा . मिरजकर तिकटी विठ्ठल मंदीर येथे श्री.मारुती पांडूरंग बाऊस्कर व सुहास सोरटे यांच्या हस्ते आरती व पालखी पुजन व नंदवाळकडे दिंडी प्रस्थान करेल . शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम मंडळ व खंडोबा देवालय यांच्यातर्फे माऊलींच्या पालखीवर बेल , भंडारा व फुलांची उधळण खंडोबा तालमीच्या वतीने अश्व पुजन करुन उभे रिंगण पार पडेल व पालखी पुईखडीला मार्गस्थ होईल . पुईखडी येथे वाखरी प्रमाणे रिंगण सोहळ्याचे व विसाव्याचे नियोजन माजी नगरसेवक शारंगधर देशमुख व एकजुटी तरुण मंडळ , विघ्नहर्ता भजनी मंडळ , राधेय ग्रुप , सानेगुरुजी वसाहत करीत आहे . रिंगण सोहळ्याचे व माऊली अश्वाचे पूजन मा.राजेश क्षीरसागर , मा . सतेज पाटील , मा.पी.एन.पाटील , श्रीमती जयश्री जाधव , मा.ऋतुराज पाटील , मा.आर. आर . पाटील ( आबा ) , मा . सुजितभाऊ चव्हाण , मा . सुरज देशमुख आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे . या सर्व कार्यक्रमाचे नियोजनासाठी श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे विश्वस्त अध्यक्ष बाळासाहेब पवार , उपाध्यक्ष दिपक गौड , सचिन चव्हाण , खजानिस राजेंद्र मकोटे , सखाराम चव्हाण , दास महाराज , संभाजी पाटील , बाळासाहेब गुरव , एम.पी.पाटील , भगवान तिवले , सखाराम चव्हाण , संभाजी पाटील कांडगावकर , संतोष कुलकर्णी , ॲड . राजेंद्र किंकर , शांताराम भाऊ सुतार यांच्यासह जय शिवराय तरुण मंडळ हे नियोजन करीत आहेत . तर उभा मारुती चौकात सायबा समुहा वतीने चहापान – फराळ दिला जाणार आहे .