इटली देशातील फ्लॉरेन्स येथे कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज द्वितीय यांच्या समाधीस आज केले जाणार अभिवादन
कोल्हापूर/प्रतिनिधी : इटली देशातील फ्लॉरेन्स या शहरात असलेल्या कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज द्वितीय यांच्या समाधीस आज युवराज्ञी संयोगिताराजे व चिरंजीव शहाजीराजे यांच्यासह प्रत्यक्ष भेट देऊन छत्रपती संभाजीराजे अभिवादन करणार आहेत.
यावेळी भारताच्या इटली येथील राजदूत, फ्लॉरेन्स शहराचे महापौर व मान्यवर वर्ग उपस्थित असणार आहेत. यानिमित्त महाराजांच्या या दीडशे वर्षे पुरातन ऐतिहासिक समाधीस्थळाची साफसफाई व सजावट करण्यात आलेली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी जुलै १९०२ साली या समधीस भेट देऊन पारंपरिक पद्धतीने पूजाअर्चा करून महाराजांस अभिवादन केले होते. आज त्याच पद्धतीने महाराजांना अभिवादन करून त्यांच्या स्मृतींचे स्मरण केले जाणार आहे.