राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर आज कोल्हापूरात येणार
शिवसैनिक आणि समर्थकांकडून जल्लोषी स्वागत होणार
कोल्हापूर/प्रतिनिधी : शिवसेना – भाजप युतीचे सरकार पुन्हा महाराष्ट्र राज्याच्या सत्तेत आले असून, मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री नाम.मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युती सरकार स्थापन करण्यात आले आहे. नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या बंडा नंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे कडवट शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर हे शिवसेनेच्या शिंदे गटात सामील झाले होते. गेले बारा दिवस ते मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या समवेत असून, शिवसेना – भाजप युतीच्या बहुमत चाचणी दरम्यानही ते मुंबईत तळ ठोकून होते. आज दि.०७ जुलै २०२२ रोजी सायं.५.३० वाजता ते कोल्हापूर शहरात दाखल होणार असून, त्यांचे स्वागत सोन्या मारुती चौक शनिवार पेठ येथे होणार आहे.जल्लोषी स्वागत करण्याची तयारी शिवसैनिक आणि क्षीरसागर समर्थकांनी केली आहे.