Saturday, December 21, 2024
Home ताज्या खासदार धनंजय महाडिक यांचे कोल्हापूरकरांनी केले गेले जंगी स्वागत

खासदार धनंजय महाडिक यांचे कोल्हापूरकरांनी केले गेले जंगी स्वागत

खासदार धनंजय महाडिक यांचे कोल्हापूरकरांनी केले गेले जंगी स्वागत

तब्बल १२०० किलो वजनाचा ४० फुटांचा फुलांचा हार क्रेनद्वारे

कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्य सभेच्या सहाव्या जागेसाठी माजी खासदार धनंजय महाडिक यांची भाजपच्या चिन्हावर अटीतटीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला झटका देत निवड ही झाली आहे. शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव करून त्यांनी हा विजय मिळविला आहे. त्यांच्या विजयानंतर कोल्हापूर सह, सोलापूर व त्यांच्या इतर चाहत्यांनी आपापल्या ठिकाणी गुलालाची उधळण करत,ढोल ताशांच्या गजरात त्यांचा विजयोत्सव हा साजरा केला.कोल्हापूर मध्ये तर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.प्रथम दुपारी घरी आल्यानंतर त्यांच्या पत्नी सौ.अरुंधती महाडिक यांनी त्यांना हार घालताच धनंजय महाडिक यांनी त्यांना उचलून घेतले त्यावेळी अरुंधती महाडिक या भावुक झाल्या व त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.नंतर त्यांनी त्यांचे आरती करून स्वागत केले. जेव्हा सौ.अरुंधती महाडिक यांनी हार घालून स्वागत केले तेव्हा त्यांनी पत्नीला खासदार झालो खासदार असे सांगितले.त्यावेळी अरुंधती महाडिक यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना आनंद झाला होता सात वर्षानंतर धनंजय महाडिक यांची पुन्हा खासदार म्हणून निवड ही झाली आहे.मुंबईत झालेल्या या निवडणुकीत महाडिक यांचा विजय हा पहाटे ४ वाजता सर्वांना समजताच त्यांच्या चाहत्यांनी फटाका वाजवून आनंद हा साजरा केला.याचबरोबर कोल्हापूर मध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.तत्पूर्वी मुंबईवरून येतानाच ठीकठिकाणी त्यांचे स्वागत करून त्यांच्यावर आनंदाचा वर्षाव करण्यात आला. कोल्हापूर मध्ये आल्यानंतर कावळा नाका येथे त्यांचे स्वागत करण्यासाठी हजारो कार्यकर्ते जमले होते. गुलालाचे उधळन करत व प्रचंड घोषणाबाजी करत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांची विजयाची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक कावळा नाका, एस.टी. स्टँड, रेल्वे स्टेशन, व्हीनस कॉर्नर,दसरा चौक,बिंदू चौक, शिवाजी पुतळा, महालक्ष्मी मंदिर येथे समाप्त करण्यात आली. त्यांच्या कार्यालयाबाहेरही जल्लोष करण्यासाठी अनेक कार्यकर्ते जमले होते. रस्त्यांवर ठिकठिकाणी ठिकाणी गुलालच गुलाल पडला होता. जंगी स्वागताने धनंजय महाडिक ही भारावून गेले होते. कोल्हापूरकरांच्या उदंड आनंदाचा वर्षावालाही कुटुंबीयांनी दाद दिली बिंदू चौक येथे आल्यानंतर भाजपकडून त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी हि मोठ्या जयघोषात घोषणाबाजी देत धनंजय महाडिक यांचे कार्यकर्त्याने स्वागत करून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.
नूतन खासदार धनंजय महाडिक यांची शहरातून निघाली जंगी मिरवणूकखासदार महाडिक, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह भाजपच्या पदाधिकार्‍यांनी घेतलं श्री अंबाबाईचं दर्शन.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह जिल्हयातील नेत्यांच्या उपस्थितीत गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत काढली गेली जल्लोषी मिरवणूक
राज्यसभेचे नूतन खासदार धनंजय महाडिक आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची आज कोल्हापुरात भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. ताराराणी चौकात गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत, वाद्यांच्या ठेक्यावर भाजपच्या कार्यकत्यार्र्ंनी जल्लोष केला.

तब्बल १२०० किलो वजनाचा ४० फुटांचा फुलांचा हार घालून स्वागत

तब्बल १२०० किलो वजनाचा ४० फुटांचा फुलांचा हार क्रेनद्वारे खासदार महाडिक आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना घालण्यात आला. मशिनद्वारे होणारी गुलालाची उधळण, वाद्यांचा गजर आणि समर्थकांच्या प्रचंड उत्साहात विजयी मिरवणूक निघाली. स्टेशन रोड, व्हिनस कॉर्नर, दसरा चौक मार्गे मिरवणूक अंबाबाई मंदिरा पर्यंत पोहोचली. अंबाबाईच्या दर्शनानंतर विजयी मिरवणुकीचीसांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments