Friday, December 20, 2024
Home ताज्या जागतिक दुग्ध दिनानिमित्त गोकुळमार्फत सायकल रॅली

जागतिक दुग्ध दिनानिमित्त गोकुळमार्फत सायकल रॅली

जागतिक दुग्ध दिनानिमित्त गोकुळमार्फत सायकल रॅली

कोल्‍हापूर/प्रतिनिधी : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने १ जून जागतिक दुग्धदिना निमित्ताने गोकुळतर्फे सकाळी ०७.०० वाजता विशेष सायकल रॅलीचे आयोजन करण्‍यात आले होते. रॅलीचे उद्घाटन संघाचे माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे यांच्‍या शुभ हस्‍ते व संचालक अजित नरके यांच्‍या उपस्थित झाले यावेळी सर्व रॅलीतील सहभागी सायकलपटूचे स्‍वागत संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी केले.
यावेळी बोलताना संघाचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरुण डोंगळे म्हणाले कि दूध हा  एक जीवनावश्यक घटक मानला जातो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच दुधाची आवश्यकता असते. दुधाचे महत्त्व पटवून देण्यासाठीच जागतिक दुग्ध दिन साजरा करण्यात येतो. यांचे अवचीत्य साधून “सायकल चालवा , आयुष्य वाढवा” व “दूध प्या आरोग्य सुधारा” ह्या सामजिक संदेश देण्याच्या उद्देशाने या सायकल रॅलीचे संघामार्फत आयोजन करण्‍यात आले.आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी सायकल चालवणे देखील आरोग्य आणि पर्यावरण दृष्ट्या लाभदायी आहे. अशा पध्दतीचे उपक्रम  संघाच्या कर्मचाऱ्यां साठी भविष्यकाळात जास्तीत जास्त राबविण्यात यावेत असे मत व्यक्त केले.
या सायकल रॅलीची सुरवात संघाच्‍या ताराबाई पार्क कार्यालय ते ताराराणी चौक, शिवाजी विद्यापीठ, शाहू नाका मार्गे पुन्हा ताराबार्इ पार्क कार्यालय असे अंदाजे  १७ किलोमीटर लांबीचा सायकल प्रवास सर्व सायकलपटूनी पूर्ण केला. या रॅलीमध्ये कोल्हापूर सायकल क्लब,सनराईज सायकल क्लब,कोल्हापूर बाइसिकल क्लब, ट्रेक अॅन्ड ट्रेल्स ग्रुप असे कोल्हापूरातील अनेक क्लबचे जवळपास २५० सायकलपटूनी सहभाग घेतला.  कु.चिन्मय दुधगावकर या १३ वर्षीय सर्वात लहान सायकलपटूंने सहभाग घेतला होता तर ६५ वर्षाचे भीमराव सुतार यांनी हि सहभाग घेतला होता.संघाचे संचालक अजित नरके व कार्यकारी संचालक योगेश गोडबोले,संघाचे कर्मचारी अधिकारी तसेच महिला सायकलपटू पण मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
यावेळी रॅली  मध्ये सहभागी  झालेल्या सायकलपटूचे स्‍वागत संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी केले  व आभार संचालक अजित नरके यांनी मानले.
यावेळी माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक  अजित  नरके, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, डेअरी व्‍यवस्‍थापक  अनिल चौधरी, आस्थापना व्यवस्थापक डी.के.पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, अमोल गडकरी, अशोक पुणेकर, अमित हवालदार व इतर अधिकारी, कर्मचारी आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments