आमदार ऋतुराज पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित शुभेच्छाचा वर्षाव
कसबा बावडा/ प्रतिनिधी : डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त व कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यासह राज्यभरातून शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला. कसबा बावड्यातील त्यांच्या ‘यशवंत निवास’ येथे व सायंकाळी अजिंक्यतारा कार्यालयात लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, हितचिंतक, विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्यासह नागरिकांची शुभेच्छा देण्यासाठी रीघ लागली होती.
आमदार पाटील यांच्या निवासस्थानी सकाळी कुटुंबीयांनी त्यांचे औक्षण करून निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सौ. शांतादेवी डी. पाटील, डी. वाय. पाटील शिक्षण समुहाचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, मेघराज काकडे, सौ.पूजा ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, देवश्री पाटील, मुलगा अर्जुन आणि आर्यमन आदी उपस्थित होते.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, ना.अमित देशमुख, ना. यशोमती ठाकूर,सत्यजित तांबे, खा.अमोल कोल्हे, आ. धीरज देशमुख,आ. प्रकाश आबिटकर, ना. नितीन राऊत, ना. प्राजक्त तनपुरे, ना.वर्षा गायकवाड,ना. विजय वडेट्टीवार,आ. नरहरी झिरवळ,आ.अतुल बेनके, आ.रोहित पवार, रोहित पाटील, आ.अरुण लाड, अनिकेत जाधव, कुणाल पाटील, संजय बनसोडे, इम्रान प्रतापगडी, सचिन सावंत, दत्तात्रय भरणे आदी नेत्यांनी आमदार ऋतुराज पाटील याना ट्वीटर द्वारे शुभेच्छा दिल्या.
आमदार प्रा. जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, विश्वेश निपुण कोरे ,गोकुळ संचालक अरुण डोंगळे, बाबासाहेब चौगले,अंजना ताई रेडेकर, मधुरिमाराजे छत्रपती, माजी जि. प. उपाध्यक्ष शशिकांत खोत, शिक्षकनेते दादासाहेब लाड, बाबा पाटील, ,पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी,डी. वाय पाटील शैक्षणिक संकुलातील स्टाफ यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आमदार ऋतुराज पाटील यांना वाढदिवसाच्या आणि पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर शैक्षणिक, वैद्यकीय, प्रशासन, पोलीस अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देखील शुभेच्छा दिल्या. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी तरुणांचे आयकॉन असणारे आमदार ऋतुराज यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या युवा पिढीच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहणारा होता. शुभेच्छा देत त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी झुंबड उडाली होती. प्रामाणिक आणि गोरगरीब जनतेच्या सेवेला सदैव तत्पर असणाऱ्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी ग्रामीण भागातून देखील नागरिक मोठ्या संख्येने आले होते. त्याचबरोबर विविध कॉलेजचे विद्यार्थी, विद्यार्थीनी, खेळाडूंनी आमदार पाटील यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी लहान स्केटिंग पटूनी देखील शुभेच्छा दिल्या, या सर्व चिमुकल्यांच आमदार ऋतुराज पाटील यांनी आपुलकीनं चौकशी करून त्यांचं कौतुक केलं. दुपारी दोन पर्यंत यशवंत या निवास्थानी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या नागरिकांची रीघ कायम होती.
सेवा रुग्नालयात फळवाटप – डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्यावतीने कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा रुग्णालय कसबा बावडा येथे रुग्णांना सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत फळे वाटप करण्यात आली. यावेळी फिजिओथेरपी कॉलेजचे प्राचार्य डॉ. जाविद एच. सागर आणि शिक्षक, शिक्षकेतर वृंद, विद्यार्थी उपस्थित होते.
रक्तदान शिबीर, थॅलासेमिया चाचणी –
आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटलीटीच्यावतीने अजिंक्यतारा कार्यालय येथे रक्तदान व थॅलासेमिया चाचणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. डी. वाय. पाटील ग्रुपच्या सीएचआरओ श्रीलेखा साटम, डी. वाय पाटील ब्लडबँकेचे डॉ. श्रीकांत पालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराला प्रारंभ झाला. यावेळी ५५ जणांनी रक्तदान केले. यावेळी थॅलासेमियाग्रस्त सई या ७ वर्षीय बालिकेसाठी लाळेचे नमुने चाचणी घेण्यात आली. यामध्ये ८८ जणांनी नमुने दिले.यावेळी प्राचार्य रुधीर बारदेस्कर, डॉ. राम पवार, राहुल दाते, प्राध्यापक उपस्थित होते.