Sunday, November 10, 2024
Home ताज्या स्वर-संजीवनातून पंडित संजीव अभ्यंकर यांचे शाहू महाराजांना अभिवादन

स्वर-संजीवनातून पंडित संजीव अभ्यंकर यांचे शाहू महाराजांना अभिवादन

स्वर-संजीवनातून पंडित संजीव अभ्यंकर यांचे शाहू महाराजांना अभिवादन

शास्त्रीय आणि भक्ती संगीतात श्रोते तल्लीन होऊन भान हरपले

शाहू नगरीत गायनाची संधी हा सन्मानच पंडित संजीव अभ्यंकर

कोल्हापूर/प्रतिनिधी : शाहू मिल येथे पंडित संजीव अभ्यंकर यांच्या शास्त्रीय आणि भक्ती संगीत गायनानाचा श्रोत्यांनी मनमुराद आस्वाद घेतला. पंडित अभ्यंकराचे शास्त्रीय आणि भक्ती संगीत श्रोत्यांसाठी मेजवानी ठरले. पंडितजींच्या गायनाचा आस्वाद घेताना श्रोते तल्लीन होऊन भान हरपले. निमित्त होते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व निमित्त शाहू मिल मध्ये आयोजित संगीत दरबार कार्यक्रमाचे. शाहू मिल येथे आज पंडित संजीव अभ्यंकर यांचा शास्त्रीय आणि भक्ती संगीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. स्वर-संजीवन कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल रेखावार व पंडित संजीव अंभ्यकर यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाला.पंडित संजीव अंभ्यकर यांना शास्त्रीय आणि भक्ती संगीत गायन प्रसंगी अजिंक्य जोशी यांनी तबला, अभिनय रवंदे यांनी संवादिनी, उद्धव कुंभार यांनी तालवाद्य आणि साईप्रसाद पांचाल यांनी स्वरसाथ दिली.
गायनाने आत्मरंजनासह लोकरंजनही होऊन ताल, सुरांच्या लयीत आयुष्य समृद्ध होते, असे सांगून पंडित अभ्यंकर म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी कलेला राजाश्रय व लोकाश्रय मिळवून दिला. यामुळे या कलानगरीतून अनेक कलाकार उदयास आले. शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या या नगरीत गायनाची संधी मिळाली हा सन्मानच आहे,अशी भावनाही पंडित संजीव अभ्यंकर यांनी यावेळी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, शाहू महाराजांनी कलेला राजाश्रय व लोकाश्रय मिळवून दिल्याने कोल्हापूरही कलानगरी म्हणून नावारुपाला आली. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वाच्या निमित्ताने शाहू राजांचे कार्य आणि विचार आजच्या पिढी समोर आणण्याचा प्रयत्न आहे. संगित दरबार कार्यक्रमामध्ये स्वर-संजीवन कार्यक्रम सादर केल्याबद्दल पंडित संजीव अभ्यंकर यांचे त्यांनी आभार मानले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या हस्ते पंडित संजीव अभ्यंकर, अजिंक्य जोशी, अभिनय रवंदे, उद्धव कुंभारआणि साईप्रसाद पांचाल यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ कदमवाडी परिसरात प्रचारफेरी

पूरस्थिती, कोरोना काळात लाटकर कुठं होते ? : सत्यजित उर्फ नाना कदम यांची लाटकर यांच्यावर टीका राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ कदमवाडी परिसरात प्रचारफेरी कोल्हापूर/प्रतिनिधी : फिल्मी...

निवडणूक जनतेनेच हातात घेतल्यामुळे विजय निश्चित – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

निवडणूक जनतेनेच हातात घेतल्यामुळे विजय निश्चित - पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास जनता जनार्दनासह अबाल वृद्ध व माता-भगिनींचा उठाव मोठा नानीबाई चिखलीत प्रचार सभेला उत्स्फूर्त...

महाविकास आघाडी पुरस्कृत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश लाटकर यांचा प्रचार शुभारंभ

महाविकास आघाडी पुरस्कृत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश लाटकर यांचा प्रचार शुभारंभ कोल्हापूर/प्रतिनिधी : महाविकास आघाडी पुरस्कृत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश लाटकर...

घोडावत विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बनविले इलेक्ट्रिक वाहन

घोडावत विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बनविले इलेक्ट्रिक वाहन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागाची कामगिरी अतिग्रे/प्रतिनिधी : संजय घोडावत विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाने इलाईट टेक्नो ग्रुप, पुणे...

Recent Comments