लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वा निमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शन आयोजित
कोल्हापूर/प्रतिनिधी : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वा निमित्य जिल्हा प्रशासनाकडूनआयोजित करण्यात आलेल्या विज्ञान व प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी सहविचार मंच व तालुका स्तरावर सहभागी झालेल्या संस्था प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभाग मुख्याध्यापक संघ या आहेत. यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शन शाहू छत्रपती मिल येथे आयोजित करण्यात आले आहे.
यामध्ये हे विज्ञान प्रदर्शन
माध्यमिक सहविचार मंचस्तर ३० एप्रिल २०२२ रोजी,तालुका स्तर ०२ मे २०२२ रोजी आणि जिल्हास्तरावर ११ मे २०२२ अशा पध्दतीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
हे विज्ञान प्रदर्शन इयत्ता आठवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी असून विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय – “लोक कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान” आणि उपविषय
१) जलसुरक्षेचे शाश्वत मार्ग
२)शाश्वत विकास व महापूर नियंत्रण
३)खेळ व्यायाम आणि आरोग्यपूर्ण जीवनशैली
४) प्रभावी वाहतूक नियंत्रण
५) शेती आधारित स्टार्टअप
असे आहेत. उपकरणांची निवड : सह विचार स्तरावरून पहिल्या ०२ उपकरणांची निवड तालुका स्तरासाठी केली जाणार आहे.तालुका स्तरावरील पहिल्या ०५ उपकरणांची निवड जिल्हास्तरासाठी केली जाणार आहे.तर जिल्हास्तरावरून पहिल्या ०५ उपकरणांची निवड केली जाईल.
तालुका स्तरावरील सर्व स्पर्धांचे नियोजन गट शिक्षण अधिकारी करणार आहेत. कोल्हापूर जिल्हा स्तरावरील संपर्क अधिकारी म्हणून श्री. विजय ओतारी, विस्तार अधिकारी शिक्षण. श्री अजय पाटील सहा. उपनिरीक्षक माध्य.श्री सागर चुडाप्पा, मुख्याध्यापक खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी तालुका हातकणंगले हे कामकाज पाहणार आहेत.