अथेना इव्हेंट कंपनीतर्फे प्रथमच सौंदर्य आयोजित
कोल्हापूर/प्रतिनिधी : अथेना इव्हेंट ही एक औपचारिक तसेच अनोपचारिक कार्यक्रम आयोजन करण्यात अग्रगण्य अशी कंपनी आहे उपभोगत्यांना प्रत्येक कार्यक्रमाचा आनंद समाधान मिळेल या प्रयत्नात नेहमीच अग्रेसर असणारी आमची कंपनी कोल्हापूर मध्ये प्रथमच सौंदर्य स्पर्धा आयोजित करत आहे.अशी माहिती आशिष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. अथेनाज मिस्टर मिस अँड मिसेस महाराष्ट्र २०२२ भाग १.
युवक युवती तसेच महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल यासाठी ही संकल्पना प्रथमच कोल्हापूर मध्ये आम्ही घेऊन आलो आहोत, ही स्पर्धा महाराजा एसी बँक्वेट हॉल, मार्केट यार्ड येथे ३० एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत होणार आहे.यामध्ये भाग घेणारे स्पर्धक हे कोल्हापूर सांगली सातारा पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत .या स्पर्धेतील विजेत्यांना त्यांचे कलागुण जसे की अभिनय नृत्य गायन या क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध करून देत आहोत आणि त्यांच्या मानाचे ताज, प्रमाणपत्र ,रोख बक्षिसे आणि इतर ही बक्षिसे देऊ करत आहोत. ही स्पर्धा तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेली आहे या स्पर्धेसाठी लाभलेले मान्यवर हे आपापल्या क्षेत्रातील उत्कृष्ट , उल्लेखनीय असे काम केलेले आहेत.