न्यू पॉलीटेक्निकची राजर्षी शाहू महाराज स्मृती रॅली उत्साहात संपन्न
कोल्हापूर/प्रतिनिधी : लोकराजा राजर्षि शाहू महाराज कृतज्ञता पर्वाचे औचित्य साधून श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस, कोल्हापूर संचलित न्यू पॉलीटेक्नीक, उंचगावच्या वार्षिक क्रिडा महोत्सव व स्नेहसंमेलनाच्या निम्मिताने राजर्षि शाहू स्मृती रॅलीचे उदघाटन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते राजर्षि शाहू समाधी स्थळ येथे पार पडले.
याप्रसंगी बोलताना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी राजर्षि शाहू महाराजांच्या विचारांच्या जतना बरोबरच त्याचा प्रसार व आचार अंगीकारणे आवश्यक असल्याचे नमूद केले. राजर्षि शाहू महाराजांनी बहुजन समाजासाठी स्थापन केलेली श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस हि संस्था व तिची शाखा न्यू पॉलीटेक्नीक हि राजर्षिच्या शिकवणी प्रमाणे वाटचाल असल्याचे समाधान व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी उपस्थित कोल्हापूर नगर अभियंता श्री. नेत्रदीप सरनोबत यांनी आपण न्यू पॉलीटेक्नीकचे माजी विद्यार्थी असल्याचा अभिमान व्यक्त करत येथील शिक्षणाच्या जोरावरच आज कोल्हापूर शहर अभियंता हि धुरा यशस्वीपने सांभाळीत असल्याचे नमूद केले.
राजर्षि शाहू समाधी स्थळ विकास आराखडा तयार करणारे माजी विद्यार्थी श्री. अभिजीत जाधव यांनी राजर्षि शाहू समाधी स्थळाच्या विकास कामांबद्दल माहिती देऊन भविष्यातील विकास कामांचा आढावा घेतला.संस्थेचे चेअरमन श्री. के. जी. पाटील यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी कार्यक्रमास येऊन आशीर्वाद दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. संस्थेमध्ये राजर्षि शाहू महाराजांचे संस्कार विद्यार्थ्यांवर असेच रुजविले जातील याची ग्वाही दिली.
न्यू पॉलीटेक्नीकचे प्राचार्य डॉ. संजय दाभोळे यांनी आपल्या प्रस्थाविकात सांगितले की न्यू पॉलीटेक्नीकचे विद्यार्थी देश परदेशात विचार घेऊनच आपली सेवा देतील.
याप्रसंगी जुना बुधवार पेठ तालिमीच्यावतीने मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक झाले. न्यू पॉलीटेक्नीकच्या विद्यार्थिनींच्या पथकाने लेझीमचा फेर धरून रॅलीचा उत्साह वाढविला. आज पासून शनिवार पर्यंत मध्ये विविध खेळ व कलागुणदर्शन पार पडत आहे. या प्रसंगी क्रीडाज्योत समाधीस्थळापासून तंत्रनिकेतनपर्यंत रॅलीद्वारे नेण्यात आली.
प्रा. मोहन शिंदे यांनी उपस्थितांना संविधान शपथ दिली. रॅली समन्वयक श्री. दिगंबर लोहार यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रा. वैभव पाटणकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, सर्व स्टाफ व विध्यार्थी उपस्थित होते.