Friday, September 20, 2024
Home ताज्या चित्रकार - शिल्पकारांची राजर्षी शाहू महाराजांना अभूतपूर्व मानवंदना

चित्रकार – शिल्पकारांची राजर्षी शाहू महाराजांना अभूतपूर्व मानवंदना

चित्रकार – शिल्पकारांची राजर्षी शाहू महाराजांना अभूतपूर्व मानवंदना

कोल्हापूर/जिमाका : राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त आयोजित लोकराजा शाहू कृतज्ञता पर्वाअंतर्गत आज सकाळी १० वाजता सुमारे १३० हून चित्रकार, शिल्पकार यांनी त्यांच्या कलेच्या सादरीकरणातून शाहू महाराजांना अभूतपूर्व अशी मानवंदना दिली . शाहू मिल परिसरात मोठ्या हॉलमध्ये एकाच छताखाली हे सर्व कलाकार एकत्र आले .कधी काळी छत्रपती शाहू महाराज यांनी आबालाल रेहमान, दत्तोबा दळवी, बाबुराव पेंटर, भाई माधवराव बागल अशा अनेक दिग्गज चित्रकार, शिल्पकारांना महाराजांनी राजाश्रय दिला. या मातब्बर कलाकारांनी कलासाधना करून ‘ कोल्हापूर स्कूल ‘अशी एक स्वतंत्र शैली निर्माण केली .या कलेचा जागर अखंडीत ठेवण्याच्या उद्देशाने हे सर्व कलाकार शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी ऐतिहासीक शाहू मिलमध्ये एकत्र आले होते.
यामध्ये १३०हून अधिक जेष्ठ व नामवंत चित्रकार / शिल्पकार सहभागी झाले होते. या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या हस्ते झाले . यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, प्रवीण गायकवाड , शिरीष बिवलकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते .नागरिकांना ही प्रात्यक्षिके तब्बल ४ दिवस पाहता येतील .या उपक्रमासाठी कॅमल कंपनीने सहकार्य केले असून सर्व कलाकारांना कॅनव्हास व रंग कॅमलने मोफत उपलब्ध करून दिले आहे.दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट,कला निकेतन कला महाविद्यालय, कला मंदिर कला महाविद्यालय, कोल्हापूर आर्ट फाउंडेशन, कोल्हापूर आर्टिस्ट गिल्ड, रंग बहार, कलासाधना यांच्यासह परिसरातील इतर चित्रकार, शिल्पकार आदींच्या उत्स्फुर्त सहभागातून हा उपक्रम संपन्न झाला.
या उपक्रमानंतर नागरिकांसाठी या चित्राचे प्रदर्शन , ‘ कृतज्ञता पर्वात ‘ शाहू मिल परिसरात होणार आहे. याप्रसंगी नंदकुमार गायकवाड , जयप्रकाश ताजणे दिलीप घेवारी , सिद्धार्थ लांडगे , रंजित चौगुले , इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत आदी उपस्थित होते .

क्षणचित्रे : –

शाहू मिल परिसराच्या ऑडीटोरियम हॉलमध्ये सकाळी ९ पासून चित्रकार /शिल्पकारांची गर्दी

आपल्या चित्र /शिल्प कलेद्वारे लोक नायकाला आदरांजली वाहण्यासाठी सहभागी कलावंतांमध्ये
अपूर्व उत्साह .

वयाची ८५ वर्ष पूर्ण करणाऱ्या आणि अभिजात चित्रकलेमध्ये PHD मिळवणाऱ्या डॉ .नलिनी भागवत यांचा या चित्रकला प्रदर्शनामध्ये उत्स्फूर्त सहभाग.

वयाची केवळ ६ वर्ष पूर्ण असणाऱ्या यज्ञेश किरण टाकळकर या बालकाच्या चित्राचे खुद्द जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक

शाडू कामाद्वारे बनविलेल्या शाहू महाराजांच्या प्रतिमांचे शिल्पकारांकडून प्रेक्षकांना मनोहारी दर्शन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे “यामिनी” प्रदर्शन आजपासून सुरू २०.२१.२२ सप्टेंबर रोजी आयोजित

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे "यामिनी" प्रदर्शन आजपासून सुरू २०.२१.२२ सप्टेंबर रोजी आयोजित कोल्हापूर/प्रतिनिधी : दसरा दिवाळी जवळ येताच कोल्हापुरच्या जनतेला वेध लागतात ते यामिनी...

पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली

पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली इराणी खणीमध्ये सार्वजनिक मंडळाच्या १०३५ व घरगुती व मंडळांच्या लहान ११०१ गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन कोल्हापूर/प्रतिनिधी :...

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न जयसिंगपूर/प्रतिनिधी : श्री.सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेची रौप्य महोत्सवी सभा सोसायटीच्या प्रांगणात १५ सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.सभेचे...

स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा

स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ भक्त कोल्हापूर शहर व जिल्हा या़ंचेवतीने ज्ञानेश महाराव या इसमाने श्री स्वामी समर्थ महाराजांच्यावर...

Recent Comments