“व्हायब्रंट महाएक्सपो २०२२” प्रदर्शन पाहण्यासाठी उद्योजकांची, विद्यार्थ्यांची तिसऱ्या दिवशी अलोट गर्दी
प्रदर्शनात १० कोटींच्या आसपास उलाढाल
प्रदर्शनाचा आजचा शेवटचा दिवस भेट देण्याचे संयोजकांचे आवाहन
कोल्हापूर/प्रतिनिधी : मेक इन इंडियाच्या धर्तीवर मेक इन कोल्हापूर आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील आधुनिक व औद्योगिक असे “व्हायब्रंट महाएक्सपो २०२२ हे प्रदर्शन १५ एप्रिलपासून शाहूपुरी जिमखाना मैदान येथे सुरू झाले आहे. प्रदर्शनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी प्रदर्शन पाहण्यासाठी उद्योजकांनी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.प्रदर्शनास चांगला प्रतिसाद मिळत असून तीन दिवसात जवळजवळ १० कोटींच्या आसपास उलाढाल ही झालेली आहे असे संयोजकांनी सांगितले आहे.
कोल्हापूर मधील उद्योग क्षेत्राला चालना मिळावी व बाहेरील वेगवेगळ्या कंपन्यांची व त्यांच्या उद्योगांची माहिती कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राला व्हावी यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री तसेच कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज व एमआयडीसी महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने हे प्रदर्शन भरविले आहे.
देश-विदेशातील विविध नामांकित १०० कंपन्यांची उत्पादने या प्रदर्शनाच्या माध्यमातून जगभर पोहोचली आहेत आणि याची माहिती उद्योजक आणि सर्व शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी यांना झालेली आहे त्याचबरोबर आपल्या कंपनीचा स्टॉल या प्रदर्शनात मांडता आला याचा आनंदही स्टॉलधारकांना असल्याचे कंपनीच्या व्यक्तीने बोलून दाखवले आहे. बऱ्याच कंपन्यांना त्यांच्या उत्पादनासाठी ऑर्डरी ही मिळाल्या असून आम्हा कंपन्यांना कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीनंतर हे प्रदर्शन एक पर्वणीच ठरत असल्याच्या प्रतिक्रिया स्टॉलधारकांनी व्यक्त केल्या आहेत. आमचे उत्पादन सर्वांपर्यंत या प्रदर्शनाच्या माध्यमातून पोहोचले हा एक चांगला उपक्रम असल्याचे कंपनीतील जाणकार व्यक्तीनी सांगितले आहे.याच बरोबर या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्हाला एकाच छताखाली सर्वच कंपन्यांची माहिती मिळत असल्याने याचा आम्हाला भविष्यात उपयोग होणार असल्याचे महाविद्यालय विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. गेल्या तीन दिवसापासून प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगवेगळी मशिनरी व नवनवीन उत्पादने पाहून आनंद दिसून येत आहे.याचबरोबर प्रदर्शनास भेट देण्यासाठी आलेल्या उद्योजकांनी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कोल्हापूरमध्ये भरविण्यात आलेले हे प्रदर्शन चांगले असून कोल्हापूर विविध क्षेत्रात अग्रेसर असणारी नगरी आहे एकाच छताखाली सर्व उत्पादने पाहण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळाल्याचे सांगितले. प्रदर्शनाच्या माध्यमातून कोल्हापूर मध्ये तयार होणारी उत्पादने व देशभरात तयार होणारी उत्पादने पहावयास मिळत आहेत. त्यामुळे शेवटचा दिवस उरल्याने सर्वांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
प्रदर्शनामध्ये कोणकोणती मशिनरी आहेत अनेक मशिनरी नवी आहेत ज्याची माहिती अजूनही उद्योजकांना नाही अशी उत्पादने व मशिनरी या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आल्याने त्यांची खरेदीही केली जात आहे नवीन उत्पादने याठिकाणी मांडण्यात आल्याने कोल्हापूरच्या उद्योग क्षेत्राला नवी चालना देणारे हे प्रदर्शन ठरले आहे. प्रदर्शनाला कोल्हापूरसह, सांगली, सातारा, ठाणे,वसई, अहमदाबाद, कोकण,हुबळी, धारवाड, पुणे, रत्नागिरी आदी ठिकाणचे उद्योजकांसह तंत्रज्ञ आणि नागरिक भेटी देत असून हे प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी होत आहे उद्या या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून उद्योजकांनी हे प्रदर्शन पहावे असे आवाहन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले आहे.या प्रदर्शनाला तिसऱ्या दिवसापर्यंत पंचवीस हजार जणांनी भेट दिल्याचे संयोजक ललित गांधी व सुजित चव्हाण यांनी सांगितले आहे. याचबरोबर उद्या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असल्याने सायंकाळी ५ वाजता या प्रदर्शनाचा समारोप होणार आहे यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री.राहुल रेखावार,नूतन आमदार जयश्री जाधव,एमआयडीसीचे रीजनल ऑफिसर राहुल भिंगारे यांच्यासह उद्योग क्षेत्रातील अन्य मान्यवर उपस्थित असणार आहेत.प्रदर्शनाच्या उद्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजता डिजिटल मार्केटिंग चा उद्योगाकरिता कसा उपयोग होणार आहे या विषयावर व्हीजीमी डिजिटल टेक्नॉलॉजी अँड प्रा. लि चे पार्टनर विजय पाटील ,ओमकार दळवी हे मार्गदर्शन करणार आहेत तर दुपारी चार वाजता विविध शासकीय योजना व त्यांचा उद्योगाकरिता होणारा फायदा या विषयावर ए.आर पाटील व संजय पाटील मी मार्गदर्शन करणार आहेत. आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स बिझनेस सोल्युशन पॉलिक्लिनिक प्रोग्रॅमवर मनीष पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत.तरी उद्याची शेवटची संधी प्रदर्शन पाहण्याची सोडू नका असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
या प्रदर्शनासाठी शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ कागल, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, कोल्हापूर एमआयडीसी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फौंड्रीमॅन असोसिएशन,कोल्हापूर
इंजीनियरिंग असोसिएशन, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल अँड हातकलंगले, डेस्टिनेशन कोल्हापूर यांचे सहकार्य मिळाले आहे.तर प्रदर्शनाचे गोल्ड स्पॉन्सर हे रिलायन्स पॉलिमर्स व रिमसा क्रेन्स प्रा.लि. हे आहेत.
या प्रदर्शनात वेगवेगळ्या कंपन्यांची पॅकेजिंग प्रॉडक्ट मशिनरी, कटिंग टूल मॅन्युफॅक्चरर, सेंटरलाइस कुलिंग सिस्टिम, सीएनसी लेथ मशीन मॅन्युफॅक्चरर,फाउंड्री केमिकल मॅन्युफॅक्चरर ,व्हॅपिंग मशीन, इंडस्ट्रियल पाईप, सोलर, मल्चिंग फिल्मस, इंडस्ट्रियल बॉक्सेस, एअर कॉम्प्रेसर,केमिकल इंजीनियरिंग एनालिसिस, इलेक्ट्रॉनिक अँड इकॉनोमिकल स्केल इलेक्ट्रॉनिक वेट मशीन, आदींसह अन्य उत्पादने पहावयास मिळत आहेत.
या प्रदर्शनाचे व्यवस्थापन हे क्रिएटिव्हज एक्झिबिशन अँन्ड इव्हेट व हाऊस ऑफ इव्हेंट या संस्थेने केले आहे