साई मंदिर टोप ते शिर्डी या मार्गावर २ लाख बीज रोपण व ५ हजार मलबारी कटिंग लागवड
कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री संत सदगुरू बाळू मामा वृक्षारोपण संकल्प केरली द्वारा वृक्षमित्र पंडित माने यांनी साई मंदिर टोप ते शिर्डी या मार्गावर २ लाख बीज रोपण व ५ हजार
मलबारी कटिंग लागवड करण्यात आली.साई मंदिर टोप ते शिर्डी दिंडी सोहळा मा गुरुवर्य आप्पासाहैब गायकवाड यांचे मार्गदर्शन व सहकार्याने कोल्हापूर ते शिर्डी पायी दिंडी पार पडली.यामध्ये मलबारी कटिंग व कर्पूरा तुळस रान तुळस याची लागवड व वाटप वुक्ष मित्र पंडित माने यांनी केली.यासाठी त्या साईराम मंडळ व साईमाऊली महिला मंडळ यांचे योगदान लाभले यामध्ये पाड्रुरग पाटील खाडे साहेब तानाजी विनायक श्रीधर सुखदेव पुजारी अशी अनेक साई भक्त यांचे योगदान लाभले.