खाद्य तेल व खाद्यतेलबियांची साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी १०७७ हेल्पलाईन कार्यान्वित
कोल्हापूर/ (जिमाका) : राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाली असल्यामुळे सर्व खाद्यतेल व तेलबियांच्या साठवणुकीवर साठा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. खाद्य तेल व खाद्यतेलबियांवर लागू केलेल्या साठा निर्बंधाच्या अंमलबजावणीबाबत तसेच त्याची साठेबाजी व काळाबाजार या संदर्भात संबंधितांना तक्रार करण्यासाठी जिल्हा स्तरावर १०७७ ही हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिली आहे.