कार्यतपस्वी आण्णासाहेब चकोते
यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
कोल्हापूर/प्रतिनिधी : चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज श्री गणेश बेकरी नांदणी प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन बेकरी उद्योगाचे कार्यतपस्वी आण्णासाहेब चकोते यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त नांदणी गावामध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये २१४ रक्तदात्यांनी रक्तदान केले आणि रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.
वाढदिवसाचे औचित्य साधून चकोते उद्योग समुहातील मॅनेजमेंट ग्रुप, अधिकारी व सर्व कर्मचारी वर्ग यांच्या वतीने अण्णासाहेब चकोते यांना वाढदिवसाच्या व नवीन प्रकल्पासाठी शुभेच्छा देण्यासाठी भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रतिवर्षीप्रमाणे सन्मती मतिमंद स्कुल येथील मुलांना दत्तक घेण्यात आले.
वृक्ष लागवड व संवर्धन ही काळाची गरज बनली आहे, सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून प्रत्येकाने एक तरी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन केले पाहिजे हा विचार घेऊन व त्याची अंमलबजावणी करत आपल्या नांदणी येथील नवीन प्रकल्पाजवळ मा. आरोग्य राज्यमंत्री श्री.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच सत्काराला उत्तर देताना श्री. अण्णासाहेब चकोते यांनी आपल्या कर्तृत्वातून समाधान घेण्यापेक्षा दुसऱ्याच्या वागण्यामुळे आजचा समाज अस्वस्थ आहे, जगणे विसरला आहे. आपले कर्तव्य करत राहिल्यास यश आणि समाधान दोन्हीचा आनंद आपण घेऊ शकतो असे बोलून दाखविले. कुटुंबप्रमुख म्हणून माझ्या गणेश बेकरीच्या कुटुंबाप्रती, समाजाप्रती माझी भूमिका मी निभावत आहे. त्याचा आनंद व समाधान मला परत उत्साह आणि उर्मी देत असतात आणि त्यांचे प्रेम आणि सहकार्य हीच माझी खरी ताकद आहे. कर्म करत राहावे आनंद मिळत जातो. असे प्रतिपादन श्री. अण्णासाहेब चकोते यांनी केले.
दिवसभर अनेक मान्यवरांच्या भेटी झाल्या त्यांनी नवीन प्रकल्पाची माहिती घेतली व सदर प्रकल्प भारतातील सर्वोत्तम प्रकल्पापैकी एक असल्याचे अभिवादन केले.
श्री.चकोते यांना अनेक मान्यवर, संस्थाचे व शासकीय पदाधिकारी, राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी भेटून फोनवरून नवीन प्रकल्पासाठी आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विविध संस्थांचे पदाधिकारी मान्यवर, पत्रकार बंधू, ग्रामस्थ व वितरक, व्यापारी यांनी प्रत्यक्षरीत्या भेटून तसेच फोनवरून चकोते यांना शुभेच्छा दिल्या.