टाळेबंदी नंतर कोल्हापूर शहरात बांधकाम क्षेत्रातील साहित्याला मागणी
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरोना महामारी विश्चात टाळेबंदी नंतर राज्यभरात सर्वच जनजीवन सामान्य झाले आहे. याच पार्श्वूमीवर हक्काचे घर घेणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. याचाच परिणाम म्हणजे बांधकाम क्षेत्रातील साहित्याला अच्छे दिन आलेले पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील नामांकित टाइल उत्पादक नीटको ने महाराष्ट्रात आपला विस्तार केला असून कोल्हापूर शहरात ३ नवे दालन उघडण्यात आले आहे. त्यांनी देशातील विविध भागांमध्ये फ्रेन्चायझी स्वरुपाच्या माध्यमातून त्यांची दालन विस्तारीकरण मोहीम सुरू ठेवली आहे. या तीन दालनांपैकी दोन फ्रेन्चायझी दालन आहेत आणि एक प्रीमियम निटको एलएसई दालन आहे. प्रेमजी ट्रेडर्स हे गंडहिंग्लजमधील भडगाव रोड येथे असून दुसरे बालाजी टाइल्स नामक शिरोळी येथील सांगली रोडवरील सांगली फाटा येथे आहे. तसेच तिसरे सांगली सिरॅमिक्स हे असून कोल्हापूर रोड, सांगली येथे सुरू केले आहे .
या तीनही दुकानांमध्ये ग्राहकांना विविध प्रकारच्या निटको टाइल्स, संगमरवर आणि मोझॅक उत्पादने पाहायला मिळतील, जी घराच्या सजावटीसाठी वापरण्यात येतात.
याबाबत निटकोचे झोनल मॅनेजर संजीव शर्मा यांनी सांगितले की, “अर्थव्यवस्था हळुहळू जोर धरत असताना देशभरातील प्रमुख शहरांमध्ये आणि नगरांमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रही विस्तारत आहे. कोल्हापूरमधील आमची फ्रेन्चायझी स्टोअर्स आमच्या वैविध्यपूर्ण उत्पादनांमधून ग्राहकांना निवडीसाठी विविध पर्यात उपलब्ध करून देतील, याबद्दल आम्ही खूप उत्सुक आहोत. जे ग्राहक त्यांच्या घरातील किचन, हॉल किंवा बाथरूमची सजावट करू इच्छितात त्यांना आमची उत्पादने पूर्णपणे समाधान देतील.”