Tuesday, July 23, 2024
Home ताज्या राजकारणातील हुक़ूमशाहीला धक्का देण्यासाठीच 'कोल्हापूर उत्तर' च्या मैदानात- हाजी असलम सैय्यद

राजकारणातील हुक़ूमशाहीला धक्का देण्यासाठीच ‘कोल्हापूर उत्तर’ च्या मैदानात- हाजी असलम सैय्यद

राजकारणातील हुक़ूमशाहीला धक्का देण्यासाठीच ‘कोल्हापूर उत्तर’ च्या मैदानात- हाजी असलम सैय्यद

कोल्हापूर /प्रतिनिधी : राजकारणात मी म्हणेन तीच पूर्वदिशा अशी भूमिका घेणाऱ्या हुक़ूमशाही प्रवृत्तीला धक्का देण्यासाठी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरल्याची घोषणा हाजी असलम सैय्यद यानी मंगळवारी पत्रकार बैठकीत बोलताना केली. ते गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत हातकनंगले लोकसभा मतदार संघातुन हाजी असलम सैय्यद बहुजन वंचित आघाडी मार्फ़त निवडणूक लढले होते. तत्कालीन खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांना त्यानी कड़वी झुंज दिली होती. या निवडणुकीत त्याना दीड लाखाच्या आसपास मते मिळाली होती. त्याना मिळालेल्या मतामुळेच राजू शेट्टी यांना पराभूत व्हावे लागले होते. हा मतदारसंघ हाजी अस्लम यांच्यासाठी नवीनच होता. शिवाय कमी कालावधी मिळाल्याने त्याना ७२२ गावापैकी केवळ १०० गावापर्यंतच आपला प्रचार करता आला होता. तरीही त्यानी लक्षणीय मते घेतल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष त्यानी वेधुन घेतले होते.गेमचेंजर म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात हाजी अस्लम यांचा रहिवास आहे. शिवाय मतदारसंघ छोटा आहे.प्रभावी जनसंपर्क असल्याने या पोटनिवडणुकीत आपली लढत पुन्हा एकदा करिश्मा दाखवेल, असा विश्वास त्यानी व्यक्त केला. हुक़ूमशाही प्रवृत्तीला वैतागलेले मतदार अपल्यालाच कौल देतील, असा आत्मविश्वास त्यानी शेवटी बोलताना व्यक्त केला. मतमोजणीनंतर जनतेच्या मनातल्या भावना उघड़ होतील, असा दावा त्यानी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि न्यायालयाचे याचिका कर्ते दिलीप पाटील यांचे काल शनिवारी कराड नजीक...

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर कोल्हापूर/२० जुलै (वार्ता.) - कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात सातत्याने होणार्‍या पावसाने कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्यांच्या पाणी...

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

Recent Comments