तरुणांना गुंतवणूकविषयी प्रोत्साहन देण्यासाठी कोटकचा पुढाकार
तरुणांच्या आर्थिक सक्षमिकरणासाठी कोटक बँक सरसावली
कोल्हापूर/ प्रतिनिधी : तरुणांमध्ये आर्थिक सक्षम होण्याचे प्रमाण वाढले असून त्यांना गुंतवणुकीसाठी अनेक संधी सध्या उपलब्ध आहे. याच पार्श्वभूमीवर ३० वर्षे वयोगटातील तरुणांना गुंतवणूकविषयी प्रोत्साहन देण्यासाठी कोटक सिक्युरिटीज लिमिटेडने नो ब्रोकरेज प्लानची घोषणा केली. या योजनेअंतर्गत ३० वर्षांपेक्षा कमी वयाच्या ग्राहकांकडून कोणत्याही समभाग, चलन, कमोडिटी आणि एफ अँड ओ व्यवहारांसाठी ब्रोकरेज शुल्क, डिलिव्हरी ट्रेड आणि इन्ट्राडे ट्रेड शुल्क आकारण्यात येत नाही.
ही योजना सर्व स्वयंचलित गुंतवणूकदार आणि ट्रेडर्ससाठी उपलब्ध आहे. डिलर्स किंवा अन्य सेवा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करणाऱ्यांना त्यांच्या विद्यमान योजनेनुसार ब्रोकरेज आकारण्यात येईल. एवढेच नव्हे तर ‘नो ब्रोकरेज प्लान’ मध्ये सहभागी होणाऱ्या नवीन ग्राहकांना ऑनबोर्डिंगनंतर १९९८ रुपयांचे व्हाउचर देखील मिळणार आहे.
याबद्दल माहिती देताना कोटक सिक्युरिटीज लिमिटेडचे एमडी आणि सीईओ जयदीप हंसराज यांनी सांगितले की, “कोटक सिक्युरिटीजची ही विशेष योजना बाजारातील नवख्या आणि तरुण गुंतवणूकदाराना अतिशय फायदेशीर असेल. शुल्कातील बदलांमुळे तरुणांना अधिक परतावा मिळेल आणि संपत्ती निर्मितीसाठी त्यांना अधिकाधिक प्रोत्साहित करेल.”
नवीन प्लानच्या उद्घाटनाप्रसंगी कोटक सिक्युरिटीजचे सह अध्यक्ष सुरेश शुक्ला म्हणाले की, “गेल्या काही महिन्यांत बाजारातील नवख्या आणि तरुण गुंतवणूकदारामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे कोटक सिक्युरिटीजच्या या नव्या योजनेचे नक्कीच स्वागत होईल. यासोबतच आमच्या अतिरिक्त सेवा आणि तज्ञ विश्लेषकांकडून मिळणारे संशोधन तपशीलही पुरवण्यात येतील. केवळ पाच ऑनलाईन प्रक्रियांतून तरुण गुंतवणूकदारांना आमच्यासोबत सामील होता येईल.”