महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतरावजी चव्हाण यांना गोकुळ मार्फत अभिवादन
कोल्हापूर /प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात भारताचे माजी संरक्षण मंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतरावजी चव्हाण यांच्या १०९ व्या जयंतीनिमीत्य गोकुळचे चेअरमन विश्वास नारायण पाटील(आबाजी) यांच्या हस्ते व संचालकसो यांच्या उपस्थितीत स्व. यशवंतरावजी चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी बोलताना श्री. पाटील म्हणाले स्व. यशवंतरावजी चव्हाण यांचे महाराष्ट्राच्या उभारणी साठी व राज्यात सहकाराची बिजे रुजवण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर अडीच वर्षात यशवंतराव चव्हाण यांनी जे कार्य केले,त्यामुळे संपूर्ण भारतात एक कार्यक्षम,सर्वसामान्य कुटुंबातुन पुढे आलेला कर्तबगार व दूरदृष्टी असलेला नेता म्हणून त्यांची देशभर ख्याती झाली. तसेच स्व. चव्हाण साहेबाचे राजकीय,सामाजीक व इतर क्षेत्रातील कार्य आम्हास प्रेरणादायी आहे असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील (आबाजी) माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले,नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाळासो उर्फ वसंत खाडे, चेतन नरके,संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, व्यवस्थापक पशुसंवर्धन डॉ.यु.व्ही.मोगले, संकलन व्यवस्थापक एस.व्ही.तुंरबेकर,जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संघाचे अधिकरी व कर्मचारी उपस्थित होते.