मनपा नेहरूनगर विद्यामंदिरात भरला साहित्यिकांचा मेळा
कोल्हापूर /प्रतिनिधी : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून तसेच १०० दिवसांचा वाचन प्रकल्प यांच्या अनुषंगाने विविध साहित्यिक उपक्रमाद्वारे मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. यामध्ये कुसुमाग्रज तथा वि वा शिरवाडकर यांच्या कवितांचे गायन ,वाचन नटसम्राट मधील कोणी घर देता का घर हे स्वगत बालकविंच्या कवितांचे कवीसंमेलन,नाट्यीकरण,, कथाकथन, वक्तृत्व,समूहगीत, नाट्यछटा सादर करण्यात आली.मी सावित्री बोलतेय,ससा आणि कासव ही कन्नड़ गुजराती व हिंदी भाषेतील गोष्ट, स्वातंत्र्यवीर सावरकर,बहिणाबाई यांच्या वेशभुषेत आलेले विद्यार्थी ज्योस्तुते, खोपा या कवितांच्या सुरांनी मंगलमय झालेले वातावरण या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. इयत्ता पाचवी ते सातवी मधील सर्व विद्यार्थी पालक यांचा उत्साह व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संयोजन सौ.वहिदा मोमीन यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक शहाजी घोरपडे रामदास वासकर, विठ्ठल दुर्गुळे अनिल शेलार ,जयश्री आवळे, सरिता कांबळे ,अमृता खुडे,रुपाली हावळ,सुजाता दाभोळकर,सुप्रिया सदरे, अनिल साळोखे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार संजय पाटील यांनी मानले.