कोटीतीर्थ वि. मंदिर मध्ये शैक्षणिक साहित्य वाटप
कोल्हापूर/प्रतिनिधी : यादवनगर येथील श्री. वरुण जोशी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मनपा. कोटीतीर्थ वि. मं. यादवनगर शाळेत विद्यार्थां समवेत केक कापून विदयार्थांना दप्तर,वह्या,पाट्या,गोष्टींची पुस्तके,अंकलिपी, मास्क,कंपास,पाण्याच्या बाटल्या इत्यादी शैक्षणिक साहित्य वाटप केले.सर्व विद्यार्थ्यांना केक, नाष्टा दिला.कार्यक्रमाला प्राथमिक शिक्षण समिती पर्यवेक्षक मा. श्री. बाळासाहेब कांबळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. नौशाद शेख,श्री.गिरीश जोशी, सौ. अश्विनी जोशी,सौ.अंकिता जोशी,विद्यार्थी, पालक उपस्थित होते. सौ. सरिता रुकडे यांनी सुत्र संचालन केले, श्री. प्रभाकर केंगले यांनी आभार मानले.