वंचित घटकांमध्ये असलेल्या व्यक्तींना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर या कार्यालयाकडून मोफत विधी सेवा पुरविली जाणार
कोल्हापूर/प्रतिनिधी : मा.महाराष्ट विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निकशानुसार वंचित घटकांमध्ये असलेल्या व्यक्तींना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर या कार्यालयाकडून मोफत विधी सेवा पुरविणेत येते यामध्ये महिला,बालके, अनुसूचित जाती जमाती मधील व्यक्ती, अपंग व्यक्तींना आणि जर यांचे उत्पन्न रुपये तीन लाख पेक्षा कमी असलेल्या व्यक्तींना मोफत विधी सेवा पुरविली जाते. दिवाणी दावे फौजदारी खटले, कौटुंबिक वाद, कामगार न्यायालय, औद्योगिक न्यायालय, ग्राहक न्यायालय या सर्व ठिकाणी या कार्यालयातील विधीज्ञ काम करीत असतात आणि या साठी मा.महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी खाली दिलेल्या तक्त्या नुसार मानधन अदा करते. सदरची माहिती प्रसिद्ध करणे करीता मा.श्रीमती व्ही.व्ही.जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि मा.श्री.पंकज देशपांडे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे आदेश प्राप्त झाले आहेत.