Monday, July 15, 2024
Home ताज्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची १६ ते ३१ जानेवारीची एकरकमी एफआरपी जमा

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची १६ ते ३१ जानेवारीची एकरकमी एफआरपी जमा

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची १६ ते ३१ जानेवारीची एकरकमी एफआरपी जमा
   
आजखेर सात लाख टनावर गाळप – अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांचे प्रसिद्धीपत्रक
   
मंगळवारपासून बँकांमधून मिळणार बिलाच्या रक्कमा

कोल्हापूर/प्रतिनिधी : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने १६ ते ३१ या जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्याची एकरक्कमी एफआरपीची २८ कोटी रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली असल्याची माहिती, कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. कारखान्याने तोडणी-वाहतूक बिलेही खात्यांवर जमा केली आहेत. मंगळवारपासून (दि.१५ ) संबंधितांनी बँकांमध्ये संपर्क साधण्याचे आवाहन, कारखाना प्रशासनाने केले आहे.पत्रकात श्री. मुश्रीफ यांनी म्हटले आहे, जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात गाळप झालेल्या ९४, ३५२ टन ऊसाची प्रतिटन २,९६० रुपयेप्रमाणे ऊसबिलाची रक्कम २७ कोटी, ६३ लाख, २३ हजार, ८४७ रुपये होते. त्यापैकी, तीन कोटी, पाच लाख, २७ हजार, ९३५ रुपये विकास सोसायट्यांच्या कर्ज खात्यावर वर्ग केले आहेत. २४ कोटी, ५७ लाख, ९५ हजार, ९१२ रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा केले आहेत.
कारखान्यांने आजअखेर सात लाख टन ऊसगाळप करून ७, ८०, ५०० साखर पोती उत्पादित झालेली आहेत. दैनिक १२.१८टक्के, सरासरी ११.२८ टक्के साखर उतारा व दैनिक १३.३२ टक्के, सरासरी १२.२८ टक्के बी हेवी साखर उतारा आहे. सहवीज प्रकल्पामध्ये ६, २८, ९५, ९०० युनिट्स वीज तयार झाली. त्यापैकी ४, ०३, ५६, ००० युनिट्स वीज महावितरणला निर्यात केली आहे. कारखान्याने या हंगामात एक कोटी लिटर इथेनॉल विक्रीचे करार केले आहेत. इथेनॉल प्रकल्पामध्ये ३९, २७, ८९६ लिटर्स इथेनॉल निर्मिती व १३, ४०, ४१५ लिटर्स रेक्टिफाईड स्पिरिट, असे एकूण ५२, ६८, ३११ लिटर्स इथेनॉल या हंगामात आजअखेर उत्पादित झाले आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेला सर्वच्या सर्व ऊस गाळपासाठी कारखान्याकडे पाठवावा, असे आवाहनही श्री. मुश्रीफ यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments