व्हायब्रंट महाएक्सपो २०२२ या प्रदर्शनाच्या महितीपत्रिकेचे उद्या १५ फेब्रुवारी रोजी अनावरण
कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री तसेच कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज व एमआयडीसी महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने व्हायब्रंट महाएक्सपो २०२२ या प्रदर्शनाचे १५ ते १८ एप्रिल या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माहितीपत्रकाचे अनावरण उद्या १५ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ८.४५ वाजता रेसिडेन्सी क्लब येथे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हाधिकारी श्री.राहुल रेखावर,महाराष्ट्रचेंम्बर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, कोल्हापूर चेंम्बर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे,जनसुराज्य शक्ती युवाचे अध्यक्ष समित कदम यांची उपस्थिती असणार आहे.कार्यक्रमासाठी कोल्हापूर इंजिनियरीग असोसिएशन सचिन मेनन, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल आणि हातकंणगलेचे अध्यक्ष संजय पेंडसे,गोषीमाचे अध्यक्ष मोहन पंडितराव, शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ कागलचे प्रेसिडेंट दिपक पाटील,इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फौंड्रीमॅन असोसिएशनचे प्रेसिडेंट रवींद्र पाटील,क्रीडाई कोल्हापूरचे प्रेसिडेंट विद्यानंद बेडेकर आदी उपस्थित असणार आहेत. या प्रदर्शनात एकूण १०० च्या पासपास कंपन्यांचा सहभाग असणार आहे. यामध्ये गोदरेज अँड बॉईसी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लि, ओसवाल ब्रदर्स, सेफसील्स मशीन प्रायव्हेट लिमिटेड ,इकविनोकस एन्व्हायरमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,इंगर सील लिमिटेड,ब्रिस्क इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड, न्यूमीनल पॉवर, अंजनी ट्यूबज इंडिया, खतेद्र मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड, रामासा क्रेन्स प्रायव्हेट लिमिटेड,यंत्रा न्यूमॅटिक अँड इक्विपमेंट,एमएनके बिल्डिंग सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड, पॅकनेक इंडस्ट्रीज ,फॅब इंडिया इंजिनियर्स, एएस अँग्री एक्वा एलएलपी, अलटेक अँलॉइज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ऍक्युशार्प कटिंग टूल्स प्रायव्हेट लिमिटेड, सुपर मीटिंग एशियन एस ई कुपरं मॅटिंग,एशियन मशीन टूल प्रायव्हेट लिमिटेड आदी कंपन्यांचा समावेश आहे. या प्रदर्शनात वेगवेगळ्या कंपन्यांची पॅकेजिंग प्रॉडक्ट मशिनरी, कटिंग टूल मॅन्युफॅक्चरर, सेंटरलाइस कुलिंग सिस्टिम, सीएनसी लेथ मशीन मॅन्युफॅक्चरर,फाउंड्री केमिकल मॅन्युफॅक्चरर ,व्हॅपिंग मशीन, इंडस्ट्रियल पाईप, सोलर, मल्चिंग फिल्मस, इंडस्ट्रियल बॉक्सेस, एअर कॉम्प्रेसर,केमिकल इंजीनियरिंग एनालिसिस, इलेक्ट्रॉनिक अँड इकॉनोमिकल स्केल इलेक्ट्रॉनिक वेट मशीन, आदीसह आणि उत्पादने पहावयास मिळणार आहेत.या प्रदर्शनासाठी शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ कागल, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर, एमआयडीसी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फौंड्रीमॅन असोसिएशन,कोल्हापूरइं जीनियरिंग असोसिएशन, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल अँड हातकलंगले, डेस्टिनेशन कोल्हापूर यांचे सहकार्य मिळाले आहे.या प्रदर्शनाचे नियोजन हाऊस ऑफ इव्हेंट यांनी केले आहे.