Friday, September 20, 2024
Home ताज्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार - शिवसेना संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार – शिवसेना संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार – शिवसेना संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणूकीबाबत शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री नाम.श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार निर्णय

कोल्हापूर / प्रतिनिधी : कोल्हापूर शहर व जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, शिवसेनेने आपली ताकत वेळोवेळी दाखवून दिली आहे. आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक त्रीसदस्यीय पद्धतीने होत असून, शिवसेनेला याचा लाभच होणार आहे. कोल्हापूर शहरासाठी गेल्या काही महिन्यात शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री नाम.श्री.उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाने पर्यावरण मंत्री नाम.श्री.आदित्यजी ठाकरे आणि नगरविकास मंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी भरघोस निधी दिला असून, कोल्हापूर शहराचा विकास करण्याकरिता शिवसेना कटिबद्ध आहे. शिवसेना आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असून, शिवसेनेचा भगवा कोल्हापूर महानगरपालिकेवर फडकवून, शिवसेनेचा महापौर करून दाखवू, असा विश्वास शिवसेना संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर यांनी व्यक्त केला. शिवसेना आजी माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची आज शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली.
यावेळी बोलताना शिवसेना संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर म्हणाले, शिवसेना आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांची आज बैठक पार पडली. शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यास शिवसैनिक तयार आहेत. ही निवडणूक स्वबळावर लढावी आणि जिंकून शिवसेनेचा महापौर करावा, यासाठी सर्वजण आग्रही आहेत. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असून, शिवसेनेचा भगवा महानगरपालिकेवर फडकून, शिवसेनेचा महापौर करून दाखवू. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील शिवसैनिकांचा दि.२७ फेब्रुवारीच्या दरम्यान मेळावा आयोजित केला जाणार आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, पाचवेळा हा मतदारसंघ शिवसेनेने जिंकला आहे. या विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणुक शिवसेनेने लढवावी. याबाबत सर्वच लोकप्रतिनिधी व पदाधिकारी आग्रही असून, शिवसैनिकांच्याही याच भावना आहेत. याबाबतचा अहवाल लवकरच शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री नाम.मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे सादर करणार आहे. या निवडणुकीबाबत शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री नाम.मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब जो आदेश देतील त्याप्रमाणे निर्णय होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख खासदार संजय मंडलिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, मा.आम. चंद्रदीप नरके, मा.आम.डॉ.सुजित मिणचेकर, मा.आम.सत्यजित पाटील, शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, शहरप्रमुख शिवाजी जाधव, माजी जिल्हाप्रमुख विनायक साळोखे आदी शिवसेना आजी माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे “यामिनी” प्रदर्शन आजपासून सुरू २०.२१.२२ सप्टेंबर रोजी आयोजित

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे "यामिनी" प्रदर्शन आजपासून सुरू २०.२१.२२ सप्टेंबर रोजी आयोजित कोल्हापूर/प्रतिनिधी : दसरा दिवाळी जवळ येताच कोल्हापुरच्या जनतेला वेध लागतात ते यामिनी...

पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली

पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली इराणी खणीमध्ये सार्वजनिक मंडळाच्या १०३५ व घरगुती व मंडळांच्या लहान ११०१ गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन कोल्हापूर/प्रतिनिधी :...

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न जयसिंगपूर/प्रतिनिधी : श्री.सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेची रौप्य महोत्सवी सभा सोसायटीच्या प्रांगणात १५ सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.सभेचे...

स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा

स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ भक्त कोल्हापूर शहर व जिल्हा या़ंचेवतीने ज्ञानेश महाराव या इसमाने श्री स्वामी समर्थ महाराजांच्यावर...

Recent Comments