Tuesday, July 23, 2024
Home देश स्थिती दिलासादायक परंतु धोका टळलेला नाही-ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांचा दक्षतेचा इशारा

स्थिती दिलासादायक परंतु धोका टळलेला नाही-ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांचा दक्षतेचा इशारा

स्थिती दिलासादायक परंतु धोका टळलेला नाही-ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांचा दक्षतेचा इशारा

 

कोल्हापूर/कागल/प्रतिनिधी : कोरोना बाधितांचा आकडा कमी होत आहे तसेच बाधितांच्या मृत्यूची संख्या ही घटत चालली आहे. बदलणारी ही स्थिती निश्चितच दिलासादायक आहे परंतु धोका टळलेला नाही, असा दक्षतेचा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. आत्ता जरी परिस्थिती चांगली वाटत असली तरी लवकरच हॉटेल, लोकल आणि रेल्वे सेवा तसेच नवरात्रोत्सवाच्या सणामुळे रुग्ण वाढणार असल्याचा तज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे खबरदारी गरजेची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कागलमध्ये डी आर माने महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत मंत्री श्री मुश्रीफ बोलत होते. मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, कागल तालुक्यात आत्तापर्यंत बाधित कोरोना बाधितांची संख्या २२१७ ही त्यापैकी १९६८ जण बरे होऊन सुखरूप बरी होऊन घरी परतले आहेत. बरी होण्याचे हे प्रमाण ८५ टक्के आहे. सध्या ॲक्टिव रुग्णांची संख्या १४६ असून दुर्दैवाने १०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ग्रामीण भागातील ६१ कागल शहरातील ३१ व मुरगूड शहरातील ११ जणांचा समावेश आहे.
दरम्यान, ग्रामीण भागासह कागल नगरपालिका व मुरगूड नगरपालिका क्षेत्रात माझे कुटुंब, माझी जबाबदारी सर्वेक्षणाचे अभियान अत्यंत उत्कृष्ट झाल्याबद्दल श्री मुश्रीफ यांनी कोरोना युद्धा यांचे कौतुक केले तसेच या सर्वेक्षणातूनही रुग्ण निष्पन्न झाल्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार करणे शक्य झाल्याचे ते म्हणाले. दोनशे बेडची सुविधा असलेल्या कागलमधील कोविड केअर सेंटर मधील निम्मे बेड नवीन येणाऱ्या कोरोना बाधितांचेसाठी तर निम्मे बेड कोरोना होऊन बरे झालेले यांच्यासाठी राखीव ठेवणार असल्याचे ते म्हणाले . कोरोना काळात स्वतःसह स्वतःची मुलं- बाळं व संसार याकडे लक्ष न देता कोरोना युद्धे म्हणून डॉक्टरांनी केलेले काम निश्चितच गौरवास्पद आहे. अशा कोरोना योद्ध्यांचा राज्यभर जिल्हा परिषद निहाय सत्कार करणार असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी येत्या जुलै पर्यंत २५ कोटी लोकांना कोरोनाची लस देणार असल्याची घोषणा केली. दरम्यान देशाची १४० कोटी लोकसंख्या असताना नेमके कोणाला..? कोणत्या वयोगटाला व कशी देणार..? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. या बैठकीला माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, कागलचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंडित पाटील, मुरगुडचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गायकवाड, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ सुनिता पाटील, कोवीड केअर सेंटरचे डॉ अभिजित शिंदे आदी उपस्थित होते.
सीपीआरला दुरुस्त करण्याची गरज
घोडावत विद्यापीठात चारशे बेडचे जंबू सेंटर आहे. तिथले वैद्यकीय अधिकारी डॉ. मदने आणि त्यांचे सहकारी गेली चार महिने घरीसुद्धा न जाता अविरत सेवा देत आहेत. दुसऱ्या बाजूला ज्या-ज्यावेळी रुग्णांसाठी सीपीआर संपर्क साधला परंतु तिथे १२२ डॉक्टर असूनही तिथला अनुभव काही चांगला आला नाही. त्यामुळे सीपीआरला दुरुस्त करण्याची नितांत गरज आहे.
शरद पवार यांना आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष करा मंत्री मुश्रीफ म्हणाले, ज्या ज्या वेळी देशासह महाराष्ट्रात कोणत्याही रूपात आपत्ती आली. त्यावेळी शरद पवार ती निवारण्यासाठी धावून गेले आहेत. कोवीड या महामारीत ही शरद पवार जनतेला दिलासा देण्यासाठी आणि कोरोना योद्ध्यांचे आत्मबल वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर फिरले आहेत. त्यामुळे श्री. पवार यांना आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष करा अशी आग्रही मागणीही त्यांनी यावेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि न्यायालयाचे याचिका कर्ते दिलीप पाटील यांचे काल शनिवारी कराड नजीक...

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर कोल्हापूर/२० जुलै (वार्ता.) - कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात सातत्याने होणार्‍या पावसाने कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्यांच्या पाणी...

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

Recent Comments