डेक्कन स्पोर्ट्स क्लब तर्फे बर्गमॅन ११३ या स्पर्धा संपन्न देशभरातील ९०० स्पर्धकांनी घेतला होता सहभाग
कोल्हापूर/ प्रतिनिधी : डेक्कन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील बर्गमॅन ११३ या स्पर्धेचे आयोजन येथील राजाराम तलाव परिसरात करण्यात आले होते.यामध्ये स्विमिंग – १.९ किलोमीटर, सायकलिंग – ९० किलोमीटर आणि रनिंग – २१ किलोमीटर या स्पर्धा झाल्या. देशभरातील ९०० स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते.या स्पर्धेमध्ये ट्रायथलॉन ही स्पर्धा तीन प्रकारांमध्ये झाली. सकाळी ६ वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धा दुपारी ४ वाजेपर्यंत तीन ते साडेआठ तास अशा कालावधीत झाल्या स्पर्धा १८ ते ३०,३१ते ४०,४१ ते ५० व ५१ च्या पुढील सर्व अशा वयोगटात झाल्या.सकाळी ६ वाजता स्प्रिंट डुएथलॉन ,६.१५ वाजता ऑलिंपिक डुएथलॉन,६.३० वाजता बर्गमॅन ११३ ची ट्रॉएथलॉन,७.४५ वाजता ऑलिंपिक ट्रॉएथलॉन,७ वाजता स्प्रिंट ट्रॉएथलॉन या वेळेत या विविध स्पर्धां झाल्या.स्पर्धा जशा झाल्या त्या पद्धतीने बक्षिसे ही उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी मार्गदर्शन करताना आरोग्य हीच खरी संपत्ती असल्याचे सांगून प्रत्येकाला शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहण्याचे आवाहन केले. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी बोलताना डेक्कन स्पोर्ट्स क्लब ने आयोजित केलेला हा उपक्रम चांगला असून शिवाजी विद्यापीठ नेहमी अशा उपक्रमाच्या पाठीशी राहील असे सांगितले.या स्पर्धेतील विजेत्यांची नावे अशी आहेत. बर्गमॅन ओपन (पुरुष)गटात निहाल बेग,वर्धन बोरगावे,संजय सूर्यवंशी(महिला)गटात समृद्धी कुलकर्णी, मैत्रेयी बोकील व श्रेया, बर्गमॅन ३१ ते ४० वयोगट(पुरुष) राहुल शिरसाट,योगेश सातव, विनोद बराले ४१ ते ५० वयोगट सुधीर पोवार, शंकर थापा,जोतिराम चव्हाण ५१ च्या पुढील(महिला)कोरिना डॅम ५१ च्या पुढे(पुरुष)भारत रजपूत,माणिक निकम,आणि डॉ प्रमोद कुटेकर.स्प्रिंट ट्रॉएथलॉन मध्ये १६ ते ३० वयोगट (पुरुष)नितीश कुलकर्णी, विक्रमसिंह कदम,चिन्मय सुर्यवंशी ३१ ते ४० वयोगट नितीश जोशी,सुशील शारंगधर,अनिल कुंभार व ५० च्या वर मुरली वत्स १८ ते ३० वयोगट(पुरुष)आयुष आपटे,शाकिब शेख,किरणकुमार शाव,१८ ते ३० ऑलिम्पिक ट्रॉएथलॉन(महिला)दीक्षा बलकवडे,अभिज्ञा बराटे ऑलिंपिक डुएथलॉन(पुरुष)३१ ते ४० वयोगट डी. वाय.एस. पी.मंगेश चव्हाण,रितेश मल्होत्रा,अलोक देसाई ५१ च्या पुढे उमेश पंचारिया, कमल कटारिया,चंद्रशेखर व्यंकटरामन ३१ ते ४० (महिला)अनुजा दानी, शिल्पा ऑलिम्पिक. ट्रॉएथलॉन (पुरुष)४१ते ५० वयोगट दिपक ओछानी,अमित गोयल आणि विजय फाळके तर ४१ ते ५० वयोगट(महिला)मिताली लोग व लिना यांच्यासह एकूण १२३ विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली.स्पर्धेसाठी वैभव बेळगावकर व उदय पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.जवळजवळ २५० व्हॉलीटीयर यांनी परिश्रम घेतले.स्पर्धकांना स्पर्धा मार्गावर पाणी,सरबत व कलिंगड व थंडगार पेय पुरविण्यात आली.राजवर्धन निगडे यांनी सर्व स्पर्धकांना सकाळचा नाश्ता व दुपारचे जेवण देऊन मोलाचे सहकार्य केले.या स्पर्धेचे आयोजन जयेश कदम,राजीव लिंग्रज,उदय पाटील,वैभव बेळगावकर, संजय चव्हाण,अमर धामणे,अभिषेक मोहिते,अतुल पोवार,समीर चौगुले,मनीष सूर्यवंशी, सयाजी पाटील,राजवर्धन निगडे यांनी केले होते.कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करूनच या स्पर्धा पार पडल्या व स्पर्धेच्या ठिकाणी केवळ सहभागी स्पर्धकांनाच प्रवेश हा होता.सूत्रसंचालन प्रमोद पाटील यांनी केले.कोल्हापूर पोलीस आणि रॉयल रायडर्स ग्रुप कोल्हापूर यांच्या वतीने रस्त्यावरील वाहतूकिवर नियंत्रण ठेवले.