Monday, December 23, 2024
Home ताज्या प्रेक्षकांच्या निखळ मनोरंजनासाठी ‘लोच्या झाला रे’ सज्ज

प्रेक्षकांच्या निखळ मनोरंजनासाठी ‘लोच्या झाला रे’ सज्ज

प्रेक्षकांच्या निखळ मनोरंजनासाठी ‘लोच्या झाला रे’ सज्ज

कोल्हापूर/प्रतिनिधी : अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी आणि सयाजी शिंदे ‘लोच्या झाला रे’ हा धमाकेदार सिनेमा येत्या ४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. सुरेश जयराम यांच्या नाटकावर आधारित निखळ मनोरंजन करणारा हा सिनेमा आहे. हा संपूर्ण सिनेमा लंडनमध्ये चित्रित करण्यात आला असून पहिल्यांदाच अंकुश, सिध्दार्थ आणि सयाजी शिंदे ही तिकडी एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. आता या चित्रपटात कोणामुळे कोणाच्या आयुष्यात लोच्या होणार आहे, हे गुपित चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाले असून त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तर नुकतेच या चित्रपटातील ‘मेरी गो राउंड’ हे गाणे रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याचे लेखन मंदार चोळकर यांनी केले आहे. अपेक्षा दांडेकर आणि हर्षवर्धन वावरे यांनी हे गाणे स्वरबद्ध केले आहे तर चिनार महेश यांनी गाण्याच्या संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. लंडनमध्ये चित्रित झालेल्या या गाण्यात आपण जगत असलेले आयुष्य कसे गोल आहे हे सांगण्यात आले आहे. लंडनच्या कलरफुल रस्त्यांवर चित्रित झालेल्या गाण्यात अंकुश, सिद्धार्थ आणि वैदेही आयुष्याचे रंग उधळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूणच आयुष्याचे मोल सांगणारे हे गीत आहे. रसिक प्रेक्षकांकडून या गाण्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये पार पडले. तिथल्या सततच्या बदलत्या हवामानामुळे चित्रीकरणादरम्यान कलाकारांसह इतर टीमलाही विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. कधी अवकाळी पाऊस तर कधी कडाक्याची थंडी यामुळे कलाकारांसोबत संपूर्ण टीमला अनेक कसरती कराव्या लागल्या. एवढ्या आव्हानांवर मात करत आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे.या सिनेमात अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी सोबतच अभिनेते विजय पाटकर, प्रसाद खांडेकर आणि रेशम टीपणीस या हरहुन्नरी कलाकारांच्या ही प्रमुख भूमिका आहेत. पारितोष पेंटर आणि रवी अधिकारी यांनी ‘लोच्या झाला रे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून यापूर्वी पारितोष पेंटर यांनी ‘धमाल’, ‘टोटल धमाल’ अशा बॉलिवूडच्या चित्रपटांचे लेखन केले आहे. संजय मेमाणे यांनी ‘लोच्या झाला रे’चे छायाचित्रण केले असून त्यांनी याआधी ‘झिम्मा’, ‘हिरकणी’, ‘हाफ तिकीट’ अशा सुपरहिट चित्रपटांच्या छायाचित्रणाची धुरा सांभाळली होती. नवीन चंद्रा, नितीन केणी, पारितोष पेंटर आणि शांताराम मनवे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर मंगेश रामचंद्र जगताप कार्यकारी निर्माता आहेत. लंडनमध्ये चित्रित झालेला हा चित्रपट मुंबई मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत आयडिया दि एंटरटेनमेंट कंपनी आणि अभिनय मुंबई प्रोडक्शन अंतर्गत बनवण्यात आला असून वितरणाचे काम यूएफओ मुव्हीजने पाहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments