Wednesday, September 11, 2024
Home ताज्या तेजस आणि अमृता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

तेजस आणि अमृता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

तेजस आणि अमृता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

‘मिसेस मुख्यमंत्री’ची जोडी करणार ‘दिशाभूल’

कोल्हापूर/प्रतिनिधी : ‘मिसेस मुख्यमंत्री’ या लोकप्रिय दूरचित्रवाणी मालिकेतून घराघरात पोहोचलेली महाराष्ट्राची लाडकी  ‘सुमी’ म्हणजेच अभिनेत्री अमृता धोंगडे आणि ‘सुमी’चा लाडका  ‘पायलट’ अर्थात अभिनेता तेजस बर्वे ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. २०२२ या नव्या वर्षात अमृता धोंगडे आणि तेजस बर्वे यांची जोडी छोट्या नाही तर मोठ्या पडद्यावर पेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यांच्या आगामी मराठी चित्रपटाचे नाव ‘दिशाभूल’ आहे.
सानवी प्रॉडक्शन हाऊसनिर्मित आणि आशीष कैलास जैन दिग्दर्शित ‘दिशाभूल’ या चित्रपटाचा स्क्रिप्ट पूजन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पुण्यात पार पडला. यावेळी अभिनेता तेजस बर्वे, निर्मात्या आरती चव्हाण, नीलेश आर. विनोद नाईक, ऍड.  प्रज्ञावंत गायकवाड, गोपाळ  कडावत, संगीतकार प्रथमेश धोंगडे, गीतकार हरिभाऊ धोंगडे, नृत्य दिग्दर्शक नील राठोड, कला दिग्दर्शक वैभव शिरोळकर, वेशभूषाकार शीतल माहेश्वरी यांच्यासह चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आशिष कैलास जैन म्हणाले, ‘दिशाभूल’ तरुणाईचा चित्रपट आहे. कॉलेजमधील मुलांची ही अनोखी कथा असून यामध्ये फ्रेंडशिप, रोमान्स आणि सस्पेन्स थ्रिलर यांचा त्रिवेणी संगम बघायला मिळणार आहे. चित्रपटामध्ये अमृता धोंगडे, तेजस बर्वेसह आणखी एक जोडी मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलावंत प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
निर्मात्या आरती चव्हाण म्हणाल्या, ‘दिशाभूल’ हा सानवी प्रॉडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट आहे. नवीन वर्षांची सुरुवात एका मराठी चित्रपटसह करताना आम्हाला आनंद होत आहे. अमृता आणि तेजस यांच्यासह मराठीतील नामवंत कलाकारांना एकत्र घेऊन एक वेगळा प्रयोग करीत आहोत, त्याला प्रेक्षक साथ देतील असा विश्वास वाटतो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा – ॲड.उज्वल निकम

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा - ॲड.उज्वल निकम घोडावत विद्यापीठात 'लाॅ' विभागाचे उदघाटन अतिग्रे/प्रतिनिधी : कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वकिली करताना आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. वाचन आणि कष्टाने कायद्याची...

Recent Comments