गंगावेश ते शिवाजी पूल आखरी रास्ता कामातील तांत्रिक अडचणी दूर करून त्वरीत रस्ता पूर्ण करावा – कृती समितीची मागणी
कोल्हापूर/प्रतिनिधी : गंगावेश ते शिवाजी पूल या रस्त्यासाठी कृती समिती च्या वतीने गेली पाच वर्षे जन आंदोलन सुरू असून शहराला जोडणाऱ्या या प्रमुख मार्गावरून कोकण ,जोतिबा , पन्हाळा, व कोल्हापूर स्मशानभूमी कडे अवजड वाहने शववाहिका तसेच प्रसुती साठी अतिशय प्रसिद्ध असणारे पंचगंगा हॉस्पीटल या मार्गावर असून अत्यवस्थ महिला व रुग्णवाहिका या मार्गावरून जातात जनरेट्यामुळे गंगावेश ते शुक्रवार गेट तसेच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा .राजेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून आखरी रास्ता तरुण मंडळ ते गायकवाड वाडा या मार्गाचे काम झाले असून स्व – आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधीतून पुढाकाराने शुक्रवार गेट ते पंचगंगा तालीम मार्गाचे काम अर्धवट झाले असून ठेकेदाराने साधनसामग्री तसेच साहित्य व मजूर हाठवले आहे या कामात काही तांत्रिक अडचणी आहेत असे प्रशासनाकडू उत्तर देण्यात येते तरी सदर कामाची जबाबदारी मा. पालकमंत्री सतेज पाटील यांनी घ्यावी व आयुक्त , जिल्हाधिकारी, मुख्य अभियंता सार्वजानिक बांधकाम विभाग यांची संयुक्त बैठक घेऊन त्वरीत मार्ग काढावा व स्वगीर्य चंद्रकांत जाधव यांचे स्वप्न पूर्ण करावे यासाठी गरज पडली तर जिल्हा नियोजन समितीतून निधी दयावा अशी मागणी आखरी रास्ता कृती समितीच्या वतीने किशोर घाटगे, राकेश पाटील , सुरेश कदम, रियाज बागवान ,सनी अतिग्रे , अनंत पाटील आदींनी केले आहे