Friday, July 19, 2024
Home ताज्या फायर फीविषयी सकारात्मक मार्ग काढू -महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे

फायर फीविषयी सकारात्मक मार्ग काढू -महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे

फायर फीविषयी सकारात्मक मार्ग काढू -महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे

कोल्हापूर/प्रतिनिधी : सराफ व्यावसायिकांना लागू करण्यात आलेल्या फायर फीविषयी सकारात्मक मार्ग काढू, असे आश्वासन महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आज सराफ संघाच्या शिष्टमंडळाला दिले, तर यातून मार्ग निघाला नाही तर आंदोलन करण्याची घोषणा अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी यावेळी केली.
महापालिकेच्या वतीने सर्व व्यापाऱ्यांना नोटीस काढून फायर फी भरण्यास सांगितले आहे, मात्र सर्वच व्यापाऱ्यांना फायर फी भरावी लागणार नाही, हे महापालिकेच्या निदर्शनास आणून वेळोवेळी ही बाब निवेदनाच्या माध्यमातून स्पष्ट केली होती तरीही फायर फी भरण्याचे आवाहन करण्यात आले.
याला अनुसरून कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या शिष्टमंडळाने आज डॉ. बलकवडे यांची भेट घेऊन निवेदन देऊन वस्तुस्थिती समजावून सांगितली. यावेळी डॉ. बलकवडे यांनी प्रशासनाबरोबर बोलून यातून सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, अध्यक्ष गायकवाड यांनी सांगितले की, निवेदनाच्या माध्यमातून फायर फीविषयी सर्व माहिती प्रशासकांना दिली आहे. यातून जर आम्हाला सूट मिळाली नाही तर नाईलाजाने आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल. यावेळी सचिव अनिल पोतदार (हुपरीकर), संचालक ललित गांधी, सुहास जाधव, प्रसाद कालेकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण श्री. भास्कर नेरुरकर हेड - हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स. तांत्रिक डोमेन आणि कायदेशीर करार असल्यामुळे बहुतांश इन्श्युरन्स संकल्पना या...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार जुलै अखेरीस किंवा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार कार्यक्रम,दहा हजार वृक्ष लावण्याची...

Recent Comments