कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सताधारी गटाचीच सत्ता,मात्र शिवसेनेने फोडला घाम
कोल्हापूर/प्रतिनिधी : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेची निवडणूक चुरशीने झाली होती या निवडणुकीत शिवसेनेने विरोधी भूमिका घेऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता आणि अंत्यत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत सत्तारूढ गटाने बाजी मारली मात्र त्यांच्या विरोधात जाऊन निवडणूक लढविलेल्या शिवसेनेने चार जागा जिंकत आपले स्थान सत्ताधार्यांना दाखवून दिले आहे. जरी सत्ताधार्यांनी बाजी मारली असली तरी शिवसेने सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी व त्यांना पाठिंबा दिलेल्या भाजपलाही आपली ताकत ही दाखवून दिली आहे. सत्ता अबाधित राहिली आहे. आज संपूर्ण मतमोजणी झाली. अनेक धक्कादायक निकाल या मतमोजणीतून लागले आहेत. यामध्ये सत्ताधारी छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचे २१ पैकी १७ उमेदवार विजयी झाले आहेत. निवडणुकीपूर्वी सत्ताधारी गटातून पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार अमल महाडिक आणि ए. वाय. पाटील असे सहा संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. तर निवडणुकीत ११ संचालक निवडून आले आहेत. यामध्ये सत्ताधारी ११ आणि विरोधी शिवसेनेचे ४ असे एकूण १५ संचालक निवडणुकीतून निवडून आले आहेत.विरोधी छत्रपती शाहू शेतकरी विकास परिवर्तन आघाडीतून खासदार संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, अर्जुन आबिटकर, रणवीर गायकवाड असे चार उमेदवार निवडून आले आहेत. या निवडणुकीत आमदार प्रकाश आवाडे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. शाहूवाडीतून विद्यमान संचालक सर्जेराव पाटील पेरीडकर यांचा सर्वात तरुण आणि नवख्या रणवीर गायकवाड यांनी पराभव केला आहे.तर आजरा तालुक्यातून विद्यमान संचालक अशोक चराटी यांचा पराभव करत सुधीर देसाई विजयी झालेत .शिरोळ तालुक्यातील लढतीत नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बाजी मारत गणपतराव पाटील यांना पराभूत केले.
यामध्ये अंतिम निकाल असा आहे.
विकास सेवा संस्था गट – पन्हाळा – (विजयी)आमदार विनय कोरे – (पराभूत)ॲड विजयसिंह पाटील
शाहूवाडी –(विजयी) रणवीर गायकवाड – (पराभूत) सर्जेराव पाटील पेरीडकर.
शिरोळ – (विजयी)ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर. ( पराभुत)गणपतराव पाटील.
आजरा – (विजयी)सुधीर देसाई – (पराभूत)अशोक चराटी.
गडहिंग्लज –(विजयी) संतोष पाटील. (पराभुत) विनायक उर्फ अप्पी पाटील.
भुदरगड – (विजयी)रणजीतसिंह पाटील. (पराभूत)यशवंत नांदेकर.
कृषि पणन व शेतीमाल प्रक्रिया(विजयी) खा. संजय मंडलिक. (पराभूत) प्रदिप पाटील भुयेकर.
(विजयी)बाबासाहेब पाटील आसुर्लेकर. (पराभूत) मदन कारंडे .
नागरी बँक पतसंस्था (विजयी) अर्जुन आबिटकर. (पराभूत) आ. प्रकाश आवाडे.
इतर शेती संस्था व व्यक्ती सभासद (विजयी)प्रताप उर्फ भैय्या माने – (पराभुत) क्रांतिसिंह पवार.
महिला राखीव विजयी -श्रुतिका काटकर,निवेदिता माने. पराभूत-लतिका शिंदे, रेखा कुराडे.
अनुसूचित जाती जमाती (विजयी)आ. राजू आवळे. (पराभूत) उत्तम कांबळे.
इतर मागासवर्गीय जाती (विजयी) विजयसिंह माने (पराभूत) रविंद्र मडके.
विमुक्त जाती जमाती (विजयी)स्मिता गवळी (पराभूत)विश्वास जाधव