Friday, December 20, 2024
Home ताज्या कोल्हापूर हायकर्सच्या शिलेदारांकडून वजीर सुळका सर हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद जवानांसाठी मोहीम समर्पित

कोल्हापूर हायकर्सच्या शिलेदारांकडून वजीर सुळका सर हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद जवानांसाठी मोहीम समर्पित

कोल्हापूर हायकर्सच्या शिलेदारांकडून वजीर सुळका सर हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद जवानांसाठी मोहीम समर्पित

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील गिर्यारोहणाच्या क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्य करणाऱ्या कोल्हापूर हायकर्स या संस्थेच्या १६ मावळ्यांनी काल सह्याद्री रांगेतील अजस्त्र आणि चढाईस कठीण मानला जाणारा वजीर सुळका सर केला आहे. गिर्यारोहणाच्या क्षेत्रातील महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणवला जाणारा हा सुळका सर करून कोल्हापूर हायकर्सने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर विभागात माहुली किल्ला आहे. याच परिसरात असलेला २८० फूट उंच असलेला वजीर सुळका प्रस्तरारोहणासाठी अतिकठीण श्रेणीत गणला जातो.सह्याद्रीचा दुर्गम भाग ,घनदाट जंगल, निसरडी वाट आणि दोन्ही बाजूला खोल दरी, पाठीवर ओझे, यातून जराजारी पाऊल घसरले तर त्या व्यक्तीला दरीच्या जबड्यात विश्रांती मिळते अशी चर्चा केली जाते. पाण्याची प्रचंड कमतरता आणि त्यानंतर वजीर सुळक्याची २८० फुटांची ९० अंशातील सरळ उभी अतिकठीण चढाई करावी लागते. शारीरिक आणि मानसिकतेचा कस पाहणारी मोहीम म्हणून या वजीर मोहिमेकडे पहिले जाते. ही मोहीम पूर्ण करून कोल्हापूर हायकर्सने आपले नाव यशस्वी चढाई करणाऱ्या सुवर्ण यादीत कोरले आहे.
या मोहिमेची सुरुवात १७ तारखेला पहाटे झाली. कोल्हापुरातून हे सर्व शिलेदार खाजगी गाडीने वजीर सुळक्याकडे रवाना झाले. दिवसभरचा प्रवास करून संध्याकाळी वजीर सुळक्याच्या पायथ्याच्या आदिवासी पाडा या ठिकाणी पोहचले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आणि डोळ्यात नवे आव्हान पेलण्याची चमक दिसत होती. संध्याकाळी पाड्यातीलच अंगणात तंबू ठोकून त्याठिकाणी मुक्काम करून पहाटे वजीरच्या पायथ्याकडे सर्वजण कूच करणार होते. कोल्हापूर हायकर्सचे संस्थापक आणि मोहिमेचे सर्वेसर्वा श्री सागर पाटील यांनी सर्वांना योग्य त्या पूर्वसूचना दिल्या. पहाटे सारेजण आवरून मोजके साहित्य पाठीवर घेऊन वजीर पायथ्याकडे रवाना झाले. घनदाट जंगलातील नुकतीच थंडीची चादर अंगावर घेऊन पहुडलेली वाट आणि सोबतीला बोचणारा वारा झेलत दोन तासांच्या पायपिटीनंतर सर्वजण सुळक्याच्या पायथ्याशी पोहचले. समोर अजस्त्र, अक्राळविक्राळ आणि आकाशाशी स्पर्धा करणारा वजीर सुळका पाहून शिलेदारांच्या आव्हानांचा कस लागणार हे प्रत्येकाला कळून चुकले. सुळका चढाईची पूर्वतयारी करून सर्वजण आपापल्या सामग्रीसह तयार झाले.
यानंतर सुळक्याला वंदन करण्यासाठी जेष्ठ गिर्यारोहक मुकुंद हावळ आणि मूळचे कोल्हापूरचे असणारे व सध्या सजा मांडा, ता कल्याण येथील तलाठी म्हणून असणारे श्री प्रशांत चौगुले यांच्या हस्ते सुळक्याचे पूजन करण्यात आले. यानंतर खऱ्या अर्थाने चढाईची सुरुवात झाली. एकीकडे अंगावर येऊ पाहणारा ९० अंशातील सरळ सुळका आणि दुसरीकडे किर्रर्र झाडीने वेढलेली, काळजाचा ठोका चुकविणारी भयाण दरी. आपले गिर्यारोहणाचे सर्व कसब पणाला लावत या मावळ्यांनी सुळका चढण्यास सुरुवात केली. अचानक येणारा जोराचा वारा, पुढील गिर्यारोहकाच्या चढाईमुळे खाली अचानक येणारे दगड-धोंडे, कंबरेचा रोप सांभाळत, अवघड टप्प्यावर शांततेत तर सोप्या टप्प्यावर वेगाने अशा सर्व आव्हानांना पेलत अखेर २ तासांच्या कमी कालावधीत कोल्हापूर हायकर्सच्या शिलेदारांनी हा सुळका पादाक्रांत केला.पवन घुगे व सागर पाटील यांच्या सक्षम व अनुभवी तांत्रिक साहाय्यामुळे ही मोहीम सुखकर झाली. मोहिमेतील पहिला शिलेदार सुळक्याच्या माथ्यावर पोहचता खालील सर्वांनी शिवगर्जनेचा उद्घोष केला आणि संपूर्ण सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात त्याचा ध्वनी गुंजत राहिला. मोहिमेतील सर्व शिलेदार माथ्यावर पोहचल्यावर देशाचा तिरंगा फडकावून देशाचे पहिले तिन्ही सेनादलप्रमुख दिवंगत मेजर जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहिन्यात आली आणि सदर मोहीम ही हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेल्या सर्व जवानांना समर्पित करण्यात आली. मोहिमेतील सहभागी शिलेदारांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कोल्हापुरातून पहिल्यांदाच अशा प्रकारे ही वजीर सुळका मोहीम सर केली आहे. याविषयी बोलताना सागर पाटील म्हणाले की, ” सदर मोहीम १२ तासांच्या कमी कालावधी मध्ये आम्ही पूर्ण केली. वाटेत अनेक आव्हाने उभी राहिली पण आम्ही त्यावर मात करून सुळका सर केलाच. ही मोहीम आम्ही देशासाठी अभिमान ठरलेल्या शहीद जवान आणि दिवंगत तिन्ही सेना दल प्रमुख मेजर जनरल बिपीन रावत यांना समर्पित करत आहोत.”
या मोहिमेत मुकुंद हावळ, अक्षय पाटील, संजय कुलकर्णी, आकाश आचार्य, जावेद मुजावर, सागर महाजन, अक्षय हिरवाडे, मुन्ना मुल्लाणी, विनायक ज्योतराव , पंकज दानावडे, ओंकारेश्वर पाटील,डॉ संदीप तांबवेकर, शिवानी नाईक, डॉ अनंत उंबरकर, विजय घोलप आणि रोहन पाटील यांनी सहभाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments