अनुप्रिया गावडे हिची संविधान सन्मान सोहळा समिती २०२२ च्या ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड.
कोल्हापूर/प्रतिनिधी : इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या अनुप्रिया गावडे, या विद्यार्थिनीने भारतीय राज्यघटनेतील प्रस्तावना, ३% कलमे सहा मिनिटे, दहा सेकंदात तोंड पाठ करून विश्वविक्रम प्रस्थापित केला. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाचा
बालहक्क अनुसंधानआतील ५४ कलमे चार मिनिटे, अकरा सेकंदात तोंडपाठ करून विश्वविक्रम प्रस्थापित केला, वर्ल्ड बुक ऑफ लंडन सहीत १५ वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ बुक मध्ये नोंदी सह अनेक रेकॉर्ड प्रस्थापित केले आहेत.
या कार्याची दखल घेऊन रामदास आठवले प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्या वतीने तिच्या नावाची सन २०२२ च्या ” संविधान सन्मान सोहळ्याच्या ” ब्रँड अँबेसिडर म्हणून घोषणा करण्यात आली.तिला इंडियन कॉन्स्टिट्यूशन डे सर्टिफिकेट ऑफ होनर ने सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी दिल्ली स्टेट यूनिवर्सिटी च्या AIIPPHS च्या कुलगुरू डॉ. अंजू भंडारी, रजिस्टर के. डी. आर्या, मा.चंद्रमणी इंदुरकर मध्यवर्ती कारागृह अधीक्षक (कळंबा) यांच्या हस्ते तिला सन्मानित करण्यात आले.भारतीय राज्यघटनेमधील मुलं तत्वांची व्याप्ती आणि सर्वसमावेशकता विद्यार्थ्यांना समजावी तसेच ती तत्वे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत म्हणून त्यांना संविधानाचा परिचय होणे आवश्यक आहे.
संविधानाची जनजागृती व्हावी, आणि सुजान, जबाबदार नागरिक सुसंस्कृत व्हावेत त्याचा उपयोग व्हावा म्हणून रामदास आठवले प्रतिष्ठान, महाराष्ट्र आणि अनिल माळवी प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्या विद्यमानाने अनेक शाळा, कॉलेज, वाचनालय मध्ये संविधान उद्देशिकेचे वाटप, असे वर्षभर उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमावेळी रामदास आठवले प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय महेंद्र शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे सचिव अनिल माळवी प्रमुख पाहुणे तर जानवी पांडव आय. एफ. बी. बी.प्रो अथलेत, मुंबई,डॉ.विशाल कांबळे मिस्टर एशिया, अजित दादा देसाई,सागर पाटील, उमेश पाटील ही प्रमुख उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन मॅडी तामगावकर संस्थापक/अध्यक्ष डीआयडी अकॅडमी, डीआयडी क्लब ऑफ गर्गिज यांनी केले, तसेच अनिल माळवी प्रतिष्ठानच्या डॉ. स्मिता गिरी,विशाल पाटील, उदय देसाई, अश्विनी माळवी यांचे सहकार्य लाभले तर सूत्रसंचालन व आभार स्वप्नील पन्हाळकर यांनी केले.