कच्च्या मालाच्या प्रचंड दरवाढीमुळे महालक्ष्मी पशुखाद्याच्या विक्री किंमतीतील वाढ अपरिहार्य – चेअरमन – गोकुळ दूध संघ श्री.विश्वास पाटी
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) च्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यामार्फत दूध उत्पादक सभासदांच्या गाई-म्हैशीं करीता महालक्ष्मी गोल्ड पशुखाद्य, मिल्क रिप्लेसर, काफ स्टार्टर,फर्टीमिन व इतर पशुखाद्य पुरवण्यात येते. आपणास माहित आहे कि यावर्षी अवकाळी पाऊस, वातावरणातील बदलामुळे पिकांवर अनिष्ट परीणाम झालेला आहे. तसेच चक्रीवादळ आदी नैसर्गिक आपत्तीमुळे पशुखाद्य उत्पादनासाठी लागणाऱ्या शेतीपूरक कच्च्या मालाच्या उपलब्धतेमध्ये सातत्याने टंचाई निर्माण झाली आहे. याशिवाय इंधन दरात झालेली वाढ, अनुषंगिक वाहतूक खर्चातील वाढ यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत कच्च्या मालाच्या दरात सरासरी १५ ते २५ % इतकी वाढ झाली आहे. तरीही संघाने आज पर्यंत पशुखाद्य विक्रीदरात वाढ केली नव्हती. गेली तीन वर्ष पशुखाद्य दर स्थिर ठेवलेले होते. परंतु सध्याचा आहे हा दर पुढे सुरु ठेवणे आज संघास आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही.आपल्या माहितीसाठी प्रामुख्याने पशुखाद्यामध्ये वापरणेत येणाऱ्या काही कच्च्या मालाचा दरवाढीचा तुलनात्मक तक्ता खालील प्रमाणे दूध उत्पादकांच्या माहिती करता दिला आहे.
कच्च्या मालाची दरवाढ टक्केवारीमध्ये (नोव्हेंबर २०२० च्या तुलनेत नोव्हेंबर २०२१ चे दर)
अ.क्र.
कच्चा माल
टक्केवारी वाढ
डी ओ आर बी
१७.०९ %
राईस पॉलिश
२३.२२ %
कॉटनसिड एक्स्ट्रॅक्शन
१२.१५ %
मक्का
२३.०५ %
रेपसिड एक्स्ट्रॅक्शन
२२.९८ %
मोलॅसिस
२०.७०%
सोयाबिन एक्स्ट्रॅक्शन
३५.३८
इतर कंपन्यांच्या तुलनेत किफायतशीर
गोकुळ दूध संघ नेहमीच दूध उत्पादक हा केंद्र बिंदू मानून त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहिला आहे व याकरिताच मागील काही महिन्यांपूर्वी इतर कंपन्यांनी व दूध संघांनी पशुखाद्याचे दर वाढवले होते तरी देखील दूध उत्पादकांचे हित लक्षात घेवून कच्च्या मालाचे दर वाढलेले असताना देखील, गेल्या काही महिन्यांपासुन संघाने पशुखाद्य दरवाढ केली नव्हती. साधारणपणे नोव्हेंबर डिसेंबर या कालावधी मध्ये कच्या मालाची आवक वाढून दर कमी होतील अशी आशा होती परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे कच्च्या मालाच्या दरात वाढ झालेली आहे. त्यामुळे अपरिहार्य कारणास्तव महालक्ष्मी गोल्ड पशुखाद्य दरामध्ये प्रति किलो २ रुपयेने (अक्षरी -दोन रुपये) वाढ करावी लागत आहे. सध्या बाजारातील इतर कंपनीचे पशुखाद्य जे संघाच्या पशुखाद्याच्या गुणवत्तेचे आहे. त्याची किंमत प्रति किलो १ ते २ रु. जास्त आहे. सदर दरवाढ करून संघाचे पशुखाद्य ना नफा ना तोटा या तत्वा प्रमाणे दूध उत्पादकांना मागणीनुसार पोहोच करीत आहोत याची खात्री बाळगावी व जास्तीत जास्त महालक्ष्मी गोल्ड पशुखाद्याचा वापर करून जनावरांचे पालन पोषण व दूध वाढीसाठी प्रयत्नशील राहावे असे अवाहन मा.चेअरमनसो यांनी केले.