सच्चा खेळाडू, उमदा माणूस आणि मोठा समाजकारणी हरपला – धनंजय महाडिक
कोल्हापूर : आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाची बातमी कळल्यावर मोठा धक्का बसला. सर्वसामान्य नागरिक, खेळाडू, कलाकार, उद्योजक यांना आधार देणाऱ्या जाधव यांनी नेहमीच समाजकारणाला महत्त्व दिले. शहराचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठी, त्यांचा मनस्वी आग्रह आणि प्रयत्न असायचा. ते स्वतः उत्तम खेळाडू होते. कोल्हापूरच्या मातीशी एकरूप झालेले नेतृत्व आज आपण गमावले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि हे दुःख पेलण्याची शक्ती त्यांच्या परिवाराला मिळावी, अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो.