मुरगुड रस्त्यावर व्हणाळीजवळील वाघजाई घाटात चालत्या कारचा स्फोट गाडी चालकाचा होरपळून मृत्यू
मुरगुड/प्रतिनिधी : कागल मुरगुड रस्त्यावर व्हणाळी (ता कागल जि कोल्हापूर) च्याजवळील वाघजाई घाटात चालत्या कारचा स्फोट झाला. गाडी जळत जळत घाटात सुमारे दोनशे मीटर खोल दरीत जाऊन पडली.आज शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.यामध्ये गाडी चालकाचा होरपळून मृत्यू झाला आहे.पूर्ण जळालेल्या अवस्थेत गाडी चालकाचा मृतदेह स्त्याच्या कडेला पडला होता.घटनास्थळी कागल पोलीस दाखल झाले. असून घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती. पेटत गेलेली गाडी दरीत पडल्यानंतर परिसरातील गवतालाही आग लागली. कागल नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाने आग विझवली. सकाळी सहाच्या सुमारास ही घटना समजली. पोलिसांनी जळालेल्या गाडीचा शोध घेतला असता गाडी नंबर MH- AQ ३७३० असून अभिजित धनवडे रा. कणेरी यांच्या मालकीची असल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान गाडी घाटात गेल्यानंतर दोन स्फोट झाल्याचे
प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितले. या घटनेची माहिती पत्रकार
शिवाजी पाटील गोरंबे यांनी कागल पोलिसांना दिली. तात्काळ
पोलीस आणि अग्निशमन घटनास्थळी पोहचले आहेत.