शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी अंबाबाईची कौमारी मातृका रूपात पूजा
कोल्हापूर/प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी,आज ९ ऑक्टोबर रोजी करवीरनिवासिनी अंबाबाईची कौमारी मातृका रुपात पूजा बांधण्यात आली होती. यावर्षीच्या उत्सवात अंबाबाईच्या सप्तमातृका संकल्पनेवर आधारित पूजा बांधल्या जात आहेत.
कौमारी, ही देवांचा सेनापती कार्तिकेयाची शक्ती आहे. तिला कार्तिकी, अंबिका म्हणूनही ओळखले जाते. ती मोरावर स्वार आहे.तिच्या हाती भाला,कुऱ्हाड, टाक आणि धनुष्य आहेत. याबाबत श्रीपूजक मयूर मुनिश्वर, सोहम मुनिश्वर आणि सुकृत मुनिश्वर यांनी माहिती दिली.दरम्यान देवीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी चांगला प्रतिसाद हा मिळत आहे.त्यामुळे आता एका तासाला १००० भाविकांना दर्शनासाठी सोडले जाणार आहे.