लैंगिक शिक्षणाबाबत मुलींना योग्य माहिती वेळेत दिली गेली तर गैरसमज दूर होतील – डॉ. उषा निंबाळकर
कोल्हापूर/ प्रतिनिधी : सतत वाढणारी लोकसंख्या गुप्तरोग, एड्स,विवाहपूर्व मातृत्व आणि लैंगिक छळ व बलात्काराचे प्रमाण हे सातत्याने समाजामध्ये वाढताना दिसत आहे याबाबत जर मुलींना योग्य माहिती वेळेत दिली गेली तर गैरसमज दूर होतील असे उदगार जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. उषा निंबाळकर यांनी काढले. जर वेळीच मुलींना याबाबतचे धोके समजले तरी याचे प्रमाणही कमी होईल असे सांगितले.जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे बालकल्याण संकुल येथे मुलींसाठी “वयात येताना” या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी डॉ. निंबाळकर या मुलींना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.यावेळी डॉ. निंबाळकर यांनी मुलींना वेळीच जर धोके समजले तर याचे प्रमाणही कमी होईल असे सांगितले. याचवेळी मुलींना मार्गदर्शन करताना शरीरबोध शिक्षण संस्था अध्यक्षा राजश्री साकळे यांनी वयात येतानाच मनात उमटणाऱ्या प्रश्नांचे निरसन जर दूर झाले तर मुलींना आयुष्यातील भावी समस्यांचे निवारण करता येईल असे सांगून प्रत्येक शाळेत लैंगिक शिक्षणाचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे असे सांगितले.यावेळी संकुलातील मुलींना जीवनसत्त्वयुक्त औषधांचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे सेक्रेटरी डॉ. महादेव जोगदंडे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.डॉ.वर्षा पाटील डॉ. उद्यम व्होरा,डॉ. शिवराज जितकर,डॉ. शिवराज देसाई, डॉ. पूजा पाटील व डॉ. सोनवणे,बालकल्याण संकुलचे अधीक्षक श्री.डवरी आदी उपस्थित होते.