वक्फ बोर्डाची कार्यशाळा मुस्लिम बोर्डिंग येथे संप्पन
कोल्हापूर/प्रतिनिधी : आज मुस्लिम बोर्डिंग मध्ये एकदिवसीय वक्फ बोर्डाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यशाळेमध्ये वक्फ बोर्डामध्ये प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्या करीता सर्व वक्फ संस्थाच्या एका प्रतिनीधींने हजर राहण्याचे अवाहन करण्यात आले होते त्या प्रमाणे ९० संस्थाचे प्रतीनिधी कार्यक्रमाला हजर होते.
कार्यक्रमामध्ये ३० नोंदणी प्रस्ताव दाखल करण्यात आले.वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधीकारी श्री अनीस शेख साहेब यांनी वक्फ बोर्डातील प्रलंबित प्रकरणे लवकरात निकाली काढण्याचे अश्वासन दिले ,तसेच प्रत्येक जिल्ह्या मध्ये एक वक्फ अधीकारी नेमण्याचे बोर्डाच्या विचाराधीन असल्याचे सांगितले.तसेच मुतवल्ली व ट्रस्टी यांनी वक्फ फंड वेळच्या वेळी जमा करावा अशी सुचना केली.डेप्युटी सि ई ओ यांनी वक्फ बोर्डाच्या कामकाजा संबंधी माहीती दिली तर अँड जावेद फुलवाले यांनी वक्फ अॅक्ट व महाराष्ट्र पब्लीक ट्रस्ट अँक्ट मधील तरतुदी संबंधात माहीती दिली.मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांनी प्रत्येक जिल्ह्यावार वक्फ बोर्डाची शाखा स्थापन करावी अशी मागणी केली साक्षी बोर्डाची दोन टक्के असून मराठवाड्यामध्ये फक्त सात टक्के आहे संस्थेने ऑडिट करून फी भरावी असे आवाहन केले इमाम, बागी , त्यांना बोटकर मार्फत मदत मिळावी असे सागितले तर बैतुल माल कमीटीचे अध्यक्ष जाफरबाबा सय्यद यांनी वक्फ बोर्डाच्या सर्व पधादीकारी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.श्री कादर मलबारी व अँड मुणाफ मणेर यांनी मनोगत व्यकत केले .अँड इम्रान इनामदार यांनी आभार मानले तर .अँड खदिजा सनदी यांनी सुत्रसंचालन केले.कार्यक्रमावेळी वक्फ बोर्ड चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिस शेख साहेब, डेप्युटी सीइओ फारुख पठाण, प्रादेशिक वक्फ अधिकारी खुसरो खान, हेड क्लार्क चेंज रिपोर्ट श्री आसीफ मुतवल्ली, हेड क्लार्क रजीस्ट्रेशन शारीक काझी ,लिगल अँड वायजर उबेद पटेलमा., कार्यक्रमाला श्री फारुख पटवेगर, आदिल फरास अँड शौकत अली फकीर,अँड सैफअली फकीर,अँड अर्शद मोमीण ,अँड शहानवाज पटेल, अँड मोहसीन शेख, श्री जमीर मुल्ला,फय्याज शिकलगार,आरीफ तांबोळी,याकुब बक्षु आदी उपस्थित होते.