वक्फ बोर्डाची उद्या २५ रोजी कार्यशाळा कोल्हापूरमध्ये
कोल्हापूर/प्रतिनिधी : उद्या शनिवार दिनांक -२५ सप्टेंबर २०२१ इ.रोजी मुस्लिम बोर्डिंग हॉल दसरा चौक ,कोल्हापूर येथे सकाळी १० ते ४ वक्फ बोर्डाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.सदर कार्यशाळेमध्ये मस्जिद, मदरसा, दर्गा व कब्रस्तान असणाऱ्या संस्थांची वादविवाद रहीत जी प्रकरणे वक्फ बोर्डामध्ये प्रलंबित आहेत. त्यामधील कागदपत्रांची पूर्तता करणे, नोंदणी प्रस्ताव दाखल करणे ,संस्थांची स्कीम दाखल करणे ,प्रलंबित स्कीम व बदल अर्जामधील अपुऱ्या कागदपत्रांची पूर्तता करणे इत्यादी. बाबी सदर कार्यशाळेमध्ये होणार असून कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबादचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विभागीय वक्फ अधिकारी पुणे हे स्वतः उपस्थित असणार आहेत. तरी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व वक्फ संस्थांचा एक प्रतिनिधी सर्व दप्तर निशी कार्यशाळेमध्ये यावा व सदर कार्यशाळेचा सर्व वक्फ संस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक
अॅड. जावेद एम फुलवालेे ,अॅड .इम्रान इनामदार ,मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन ,गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, ऍड खदिजा सनदी, ऍड .सैफ फकीर यांनी केले आहे . उपस्थित राहणा-यांना कोवीड नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.