विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांची जिल्हा कार्यकारिणी घोषित
कोल्हापूर/प्रतिनिधी : विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांची जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून अध्यक्ष म्हणून शशिकांत मुचंडी, तर कार्याध्यक्ष म्हणून प्रसाद मुजुमदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गिरीधर जोशी आणि बाबूभाई पटेल यांची उपाध्यक्ष म्हणून, तर अधिवक्ता रणजितसिंह घाटगे यांची मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बजरंग दलाच्या संयोजकपदी सुरेश रोकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मातृशक्ती संयोजिका म्हणून सुनेत्रादेवी घाटगे यांची, तर दुर्गावाहिनी संयोजिका म्हणून ऋतुजा जमदाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोरक्षा प्रमुख म्हणून संजय पाटील, मठ-मंदिर संपर्कप्रमुख म्हणून श्री. उमाकांत राणिंगा, धर्माचार्य संपर्क प्रमुख म्हणून प्रसन्न मालेकर, तर समन्वय – जनसंपर्क मंचप्रमुख म्हणून श्री. राजेंद्र मकोटे , प्रसिद्धी प्रमुखपदी संपत नरके ‘ तसेच यांची नियुक्ती करण्यात आली आहे.