Monday, July 15, 2024
Home ताज्या गणेशाच्या आशीर्वादाने डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन - डेबिट कार्ड किंवा क्यूआर कोडद्वारे डिजिटल...

गणेशाच्या आशीर्वादाने डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन – डेबिट कार्ड किंवा क्यूआर कोडद्वारे डिजिटल देणगी पद्धती,फिनो पेमेंट बँकेचा उपक्रम  

गणेशाच्या आशीर्वादाने डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन – डेबिट कार्ड किंवा क्यूआर कोडद्वारे डिजिटल देणगी पद्धती,फिनो पेमेंट बँकेचा उपक्रम

कोल्हापूर/प्रतिनिधी : गणेश चतुर्थी, महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण. उत्साहाच्या वातावरणात नेहमीच भक्तीभावाने आणि धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदाही लाडक्या बाप्पाचे स्वागत करत , फिनो पेमेंट्स बँकेने डिजिटल बँकिंगद्वारे ग्राहकाच्या जीवनात समृद्धी आणण्याचे योजले आहे. श्री गणेश बँकींग पाँईटवर विराजमान होवून शुभाशिर्वाद देणार आहेत.उदयोन्मुख भारतीय ग्राहकांसाठी फिनोटेक बँकेने शहराच्या विविध फिनो हमेशा बँकिंग पॉईंटवर श्रींच्या मूर्ती विराजमान आहेत. हातात एटीएम डेबिट कार्ड आणि मायक्रो एटीएम डिव्हाइस अशा रूपात गणेशाचे मनमोहक रूप लोकांना डिजिटल बँकिंग वापरण्यास प्रोत्साहित करते . फिनो पेमेंटस बँकेचा “बँकिंग गणेश “हा उपक्रम गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशी पर्यंत सुरू राहील. फिनो पेमेंट्स बँकेच्या या पाॅईंटवर भाविक दर्शनासाठी येत आहेत.                                                                    फिनो पेमेंट्स बँकेचे अनिल पवार (रिजनल हेड) म्हणाले, कोविडनंतरचे भारतीय डिजिटल बँकिंगमध्ये अधिक वेगाने अनुकूल बदल होत आहेत. “पण अजूनही ग्राहकांचा एक मोठा वर्ग आहे ज्यांनी अद्याप डिजिटल बँकिंगचे फायदे समजले नाही. क्यूआर कोड (QR code) किंवा डेबिट कार्डद्वारे डिजिटल देणगी देण्याची परवानगी देऊन समाजातील या घटकाला डिजीटली सक्षम करण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलण्याचा बँकेचा हेतू आहे.फिनोचे उद्दीष्ट हे ग्राहकांचे व्यवहार सुनिश्चित करणे आणि त्यांच्यातील डिजीटल बँकींगची भीती दूर करून डिजिटल व्यवहारांचे फायदे समजावणे हा आहे. हा उपक्रम फिनोच्या ग्राहकांना त्यांच्या सहाय्यक सेवांपासून सक्षमीकरणा (सेल्फ-मोड)पर्यंतच्या प्रवासाचा एक भाग आहे.फिनो पॉइंट्सवर, ग्राहक नवीन खाते 4 मिनीटाच्या आत उघडणे, घरगुती पैसे हस्तांतरण,, मायक्रो एटीएम आणि आधार सक्षम पेमेंट सिस्टम (एईपीएस) द्वारे पैसे काढणे इतर उत्पादने जसे आरोग्य, वीमा (लाइफ इन्शुरन्स) आणि पे युटिलिटी बिल आणि लोन ईएमआय यासारख्या सेवांचा लाभ घेऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments