गोकुळ हे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे श्रद्धास्थान – डॉ.महेश कदम
विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दूग्ध) विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दूग्ध) डॉ.महेश कदम यांचा गोकुळतर्फे सत्कार
कोल्हापूर/प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये डॉ.महेश कदम यांची विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) विभाग पुणे या पदावरती नियुक्ती झालेबद्द्ल गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना चेअरमन श्री.पाटील म्हणाले दूध उत्पादक शेतकरी, ग्राहक यांचे हित व सहकारातील मार्गदर्शक तत्वांची जपणूक करत,गोकुळची वाटचाल चालू आहे. डॉ महेश कदम यांनी गोकुळ दूध संघास शासकीय स्तरावर सर्वोतपरी मदत व मार्गदर्शन करावे व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्या दिल्या.
सत्कारावेळी बोलताना डॉ.महेश कदम म्हणाले कोल्हापूरची महालक्ष्मी जसे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे तसे कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांचे गोकुळ हे श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्रात दूग्ध व्यवसायात गोकुळचे योगदान मोलाचे आहे. राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या गोकुळ दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी निर्माण केलेल्या विविध योजना आणि सोयी सुविधांमुळे लाखो शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. त्यातून पारंपारिक दुग्ध व्यवसायाला व्यवसायिक स्वरूप देऊन गोकुळ दूध संघाने दुग्ध व्यवसायाला संघटीत स्वरूप देऊन शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य दिले आहे. असे गौरोद्गार काढले.
यावेळी संघाचे चेअरमन मा.श्री. विश्वास पाटील, माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह कृ. पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, अंबरिषसिंह घाटगे, चेतन नरके संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर, बोर्ड सेक्रटरी एस.एम.पाटील आदि उपस्थित होते.