थकित एफ आर पी वरील १५ टक्के व्याज कारखानदारांना द्यावेच लागणार. मुंबई उच्च न्यायालयातून या संदर्भातील कारखानदारांची याचिका फेटाळली
कोल्हापूर/प्रतिनिधी : सन २०१८ / १९ च्या हंगामातील सर्वच कारखान्यांनी जवळपास तीन महिने शेतकऱ्यांना एफ.आर.पौ. दिली नव्हती. यासंदर्भात गेली दोन वर्ष सातत्याने जय शिवराय किसान संघटना, आंदोलन अंकुश व बळीराजा संघटना यांनी सातत्याने आवाज उठवून थकित एफ आर पी वरील व्याज देण्यास साखर आयुक्तांचा आदेश आणला होता. यासंदर्भात साखर कारखानदारांनी सहकार मंत्र्यांकडे धाव घेतली होती व तेथून स्थगिती मिळवली होती. माननीय सहकार मंत्र्यांनी दिलेली स्थगिती तिन्ही संघटनांनी मिळून उठवली होती. यासंदर्भात साखर कारखानदार उच्च न्यायालयात गेले होते. आज मुंबई उच्च न्यायालयात याची सुनावणी होऊन कारखानदारांची व्याजा संदर्भात स्थगिती देण्या कामी केलेली याचिका फेटाळण्यात आली व वरील शेतकऱ्यांचे नियमाने होणारे पंधरा टक्के प्रमाणे व्याज द्यावे लागणार असा आदेश झाला. आंदोलन अंकुश चे धनाजी चूडमुंगे, जय शिवराय चे शिवाजी माने व बळीराजाचे बी. जी. पाटील काका यांनी अथक परिश्रम घेतले. याबद्दल या तिन्ही संघटनातील सर्व कार्यकर्त्यांचे व सहकार्य केलेल्या सर्वच शेतकऱ्यांचे अभिनंदन.