शिवसेनेच्यावतीने दहीहंडी ऐवजी शिवसहाय्य हंडी
कोरोना आणि महापुराच्या संकटकाळात कलावंताना मदतीचे वाटप
कोल्हापूर/प्रतिनिधी : शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री नाम.मा.श्री.उद्धव ठाकरे साहेब यांनी महाराष्ट्रातील प्रमुख गोविंदा पथकांसोबत बैठक घेवून जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण सणवार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेऊ, मानवता दाखवू आणि कोरोनाला पहिले हद्दपार करू असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यावा असे आवाहन केले आहे. या आवाहनास प्रतिसाद देत कोल्हापूर शहरात शिवसेनेच्या वतीने होणारी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणारी शिवसेनेची भगवी दहीहंडी यंदा रद्द करून, शिवसहाय्य हंडी द्वारे कोरोना आणि महापुराच्या संकटकाळात बेरोजगार झालेल्या गरजू कलावंताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर साहेब यांच्या मार्गदर्शनाने शिवसेनेच्या वतीने जीवनावश्यक साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झालेल्या कार्यक्रमात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने ऑर्केस्ट्रा, नाटक अशा सुमारे ६० कलावंताना या मदतीचे वाटप युवा नेते श्री.ऋतुराज क्षीरसागर, शिवसेना शहरप्रमुख श्री.जयवंत हारुगले, युवा सेनेचे श्री.हर्षल सुर्वे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
कोरोना विषाणूमुळे देशात बेरोजगारी निर्माण झाल्याने कलाकारांची उपासमार होऊ लागली आहे. कलावंत, गायक, वादक, नर्तक हे सर्व कलाकार केवळ त्यांच्या अंगी असलेल्या कलेवरच उदरनिर्वाह करतात. मात्र, गेल्या दोन वर्षापासून कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन असल्याने सर्वच कलावंत रोजगारापासून वंचित आहेत. त्यातच कोल्हापूर जिल्ह्यातील यंदाची महापूर आणि लॉकडाऊन स्थिती यामुळे सर्वत्र सण, समारंभ, जत्रा, लग्नकार्ये न झाल्याने त्यावर अवलंबून असणारे कलाकार बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे या कलाकारांची आणि त्यांच्या कुटुंबियांची अवस्था अंत्यत गंभीर बनली आहे. अशावेळी या कलाकारांना मदतीचा हात म्हणून कर्तव्य आणि सामाजिक भावनेतून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून शिवसेना शाखा छत्रपती शिवाजी महाराज चौक यांच्या वतीने होणारी भगवी दहीहंडी रद्द करून त्याऐवजी गरजू कलावंताना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. यामध्ये तांदूळ, साखर, तुरडाळ, तेल आदी कडधान्य आदींचा समावेश आहे.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवसेनेची भगवी दहीहंडीचे आयोजक शिवसेना शाखाप्रमुख कपिल केसरकर, राहुल अपराध, संयुक्त छत्रपती शिवाजी महाराज चौक रिक्षा मित्र मंडळचे अध्यक्ष संभाजी पाटील, केदार भुर्के, राकेश माने, शैलेश हिरासकर, निहाल मुजावर, रुपेश डोईफोडे, मुबीन मुश्रीफ, रोहित गवंडी, सुहेल बागवान, अभिजित कदम आदी उपस्थित होते.