Wednesday, October 9, 2024
Home ताज्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून कोकणातील युवकांना रोजगार व व्यवसायामध्ये...

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून कोकणातील युवकांना रोजगार व व्यवसायामध्ये सुवर्ण संधी मिळणार- विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून
कोकणातील युवकांना रोजगार व व्यवसायामध्ये सुवर्ण संधी मिळणार- विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सिंधुदुर्गात प्रचंड प्रतिसाद
सिंधुदुर्ग/प्रतिनिधी :  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केंद्रिय मंडळात संधी मिळाल्यानंतर आता कोकणातील युवकांना रोजगार, स्वयं रोजगार, उद्योगधंद्याची अधिक संधी उपलब्ध होणार आहे. यामुळे आता ख-या अर्थाने कोकणाच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे असे प्रतिपादन विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले. जन आशीर्वाद यात्रेच्या सातव्या आणि अखेरच्या दिवसाची सुरुवात महात्मा गांधींचे अनुयायी स्व. अप्पासाहेब पटवर्धन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कणकवली येथील गोपुरी आश्रमाला भेट देत झाली. केंद्रीय मंत्री राणे यांच्यासमवेत विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती आहे. यावेळी आमदार रविंद्र चव्हाण, आमदार कालिदास कोळंबकर,आमदार नितेश राणे,निलेश राणे, राजन तेली यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे स्वागत बांदा, आडाळी एमआयडीसी, दोडामार्ग – गांधी चौक येथे करण्यात आहे. जन आशीर्वाद सासोली-हणखणे – हसापूर-चांदेल-कासारवंडे- धारगळ हायवे – मार्गे सातार्डा येथे काढण्यात आली. सातार्डा, मळेवाड, शिरोडा, वेंगुर्ला या ठिकाणी जन आशीर्वादच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्यात आला.
नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी या जन आशीर्वाद यात्रेची सुरवात झाली होती. जन आशीर्वाद यात्रेचा साक्षीदार मी पहिल्या दिवसापासून आहे, एक अभूतपूर्व असा आशीर्वाद केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला मिळाला आहे. कोकणच्या सुपुत्रावर जनतेचं किती प्रेम व विश्वास आहे हे या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने दिसून येत असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
गेली ७ वर्ष देशाचे नेतृत्व करत असताना देशाला प्रगतीकडे नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून झाले. परंतु महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत महाविकास आघाडी सरकार राज्यात आल्यापासून येथे कोणत्याही प्रकराची ठोस विकास काम झालं नसल्याची खंत दरेकर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, नारायण राणे  मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात जी विकासाची गती होती, कोकण विकासाकडे जात होता तो विकास आता थांबला आहे. गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यासाठी अनेक योजना आणल्या, फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कोकणाला लाखोंचा निधी देण्यात आला परंतु या मंजूर योजना पुढे नेण्याऐवजी त्या विकास कामांना कात्री लावण्याचं दुर्दैवी  काम महाविकास आघाडी सरकारने केलं. राणे यांना केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा जनतेच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे, आमचा रखडलेला विकास जर कोण पुढे नेऊ शकतील तर ते केवळ केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्याच विश्वासातून, प्रेमातून आज येथे प्रचंड प्रमाणात गर्दी दिसून असल्याचे दरेकर यांनी सांगितले.
राज्यातील ८०% उद्योग राणे यांच्या विभागाकडे आहेत. बेरोजगार तरुणांसाठी, व्यावसायिकांसाठी विविध प्रकारच्या योजना आहेत. तसेच ७ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेक योजना आणल्या. शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे गेले, आयुष्यमान योजनेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना दिलासा देण्याची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणली. उज्वला गॅसच्या माध्यमातून महिलांसाठी गॅस उपलब्ध करून देण्यात आले तर बेरोजगरांसाठी मुद्रा सारखी योजना पंतप्रधान मोदी यांनी आणली. त्यामूळे समाजातील सर्व घटकांसाठी, त्यांची उन्नती व्हावी या भावनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना आणले असल्याचे दरेकर यांनी सांगितले.
दरेकर म्हणाले, आज येथील लोकांमध्ये उत्साह आहे, याचं उत्साहातून आपल्याला रचनात्मक काम करायचं आहे. केवळ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना हार घालून, त्यांचा सन्मान करून आपली जबाबदारी संपणार नाही. या उत्साहाबरोबर त्यांना दिलेल्या खात्यातून आपल्याला सर्वसामान्य लोकांना काय देता येईल, या खात्याच्या माध्यमातून आपण तालुका व  तालुक्यातील बेरोजगार तरूणांच्या रोजगाराचे नियोजन करत कोणते व्यवसाय आणू शकतो ? ते समजून घेत कार्य करण्याची आवश्यकता आहे असेही दरेकर यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. तसेच भाजपची विचारधारा पुढे नेहण्याचं काम आपण केलं असून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी केवळ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर नसून ही जबाबदारी तुमची व माझी आहे या भावनेतून आपण सारी लोकं काम करू असेही दरेकर यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
कोकणात एम. आय. डी. सी मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु आज ते दुरावस्थेत आहे.  अनेक कारखाने बंद आहेत. अनेक विकास कामांसाठी भूमी संपादित झाले परंतु कारखाने आले नाही. त्यामुळे उद्योगांना संजीवनी देण्याचं काम राणे यांच्या माध्यमातून होईल असा विश्वास आज येथील लोकांमध्ये आहे. कोकणचा विकास तर होईल, परंतु जोपर्यंत आर्थिक विकास होत नाही, तोपर्यंत कोकणवासी आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार नाहीत. कोकणवासीयांचे आर्थिक स्तर उंचावला पाहिजे, यासाठी राणे यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येईल असा विश्वास दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

शेंडा पार्कमध्ये १,१०० बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलचे उद्या भूमिपूजनवै द्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

कोल्हापुरात साकारत आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी शेंडा पार्कमध्ये १,१०० बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलचे उद्या भूमिपूजनवै द्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; पालकमंत्री...

शेंडा पार्क हॉस्पिटल भूमिपूजनसह केडीसीसी बँकेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

शेंडा पार्क हॉस्पिटल भूमिपूजनसह केडीसीसी बँकेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण सेनापती कापशी येथील सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पुतळ्याचेही अनावरण कागल विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा उत्तुर येथील...

लोकसभा व राज्यसभेत जातीनिहाय जनगणना मंजूर करू विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांची घोषणा

लोकसभा व राज्यसभेत जातीनिहाय जनगणना मंजूर करू विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांची घोषणा   कोल्हापूर/प्रतिनिधी : दलित मागास वंचित वर्गातील लोकांना उद्योग, व्यवसाय याठिकाणी कुठेही फारशी...

शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिवशी आई अंबाबाई श्री क्षेत्र सन्नती येथे चंद्रालांबा देवीच्या रूपात पूजा

शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिवशी आई अंबाबाई श्री क्षेत्र सन्नती येथे चंद्रालांबा देवीच्या रूपात पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज अश्विन शुक्ल तृतीया. शारदीय नवरात्र महोत्सवाचा तिसरा...

Recent Comments