नाम. सतेज पाटील यांची भारतीय तलवारबाजी महासंघाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल गोकुळतर्फे सत्कार
कोल्हापूर/प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये भारतीय तलवारबाजी महासंघाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल गोकुळ परिवारा तर्फे जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. सतेज ऊर्फ बंटी पाटीलसाहेब यांचा सत्कार राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफसाहेब यांच्या हस्ते व आमदार राजेश पाटील तसेच गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या उपस्थित करण्यात आला.यावेळी बोलताना या खेळातील खेळाडूना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगारी करण्यासाठी नक्कीच प्रोत्साहन देऊ. भविष्यात या खेळातीली जास्ती जास्त आंतरराष्ट्रीय खेळाडू जिल्ह्यात तयार करण्यासाठी प्रयत्नशील राहू. याप्रसंगी चेअरमन मा.श्री.विश्वास पाटील, माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके,नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील,नंदकुमार ढेंगे,कर्णसिंह गायकवाड बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, अंबरिषसिंह घाटगे, संचालिका अंजना रेडेकर,कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर संघाचे अधिकारी उपस्थित होते