मनमिळाऊ कॅमेरामन प्रमोद सौंदडे यांचे निधन पत्रकारितेत व्यक्त होत आहे हळहळ
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शाहूवाडी येथे रहिवाशी असलेले व कोल्हापूरमधील वृत्तवाहिणीचे कॅमेरामन प्रमोद तातोबा सौंदडे (वय 34 मलकापूर ता. शाहूवाडी ) यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,आई व दोन लहान मुले व एक मोठा भाऊ असा परिवार आहे .बारा वर्षांपूर्वी प्रमोद यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिन्यांनीतून कामाला सुरुवात केली यानंतर आयबीएन-लोकमत या वृत्तवाहिनीचा कॅमेरामन म्हणून रुजू झाले होते .इलेक्ट्रॉनिक माध्यम हे कॅमेराशिवाय घडलेल्या घटनेची बातमी बोलकी होत नसते शिवाय घटनेची तीव्रता लोकांसमोर येत नाही, प्रमोद याच्याकडे घडलेली घटना आणि त्याचे व्हिडिओ चित्रण कल्पकतेने टिपण्याचे कौशल्य होते त्याने अनेक घटनांची दृश्ये चांगल्या पद्धतीने कॅमेराबद्ध करून समाजासमोर आणली या कामगिरीमुळेच त्यांना कोल्हापूर प्रेस क्लब ने उत्कृष्ट कॅमेरामन या पुरस्काराने सलग दोनदा गौरवले होते प्रमोद सौंदडे यांचा स्वभाव मनमिळावू होता पत्रकारितेत प्रमोद नेहमी आनंदी व उत्साही काम करत होते. त्याच्या या अकाली जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर कोल्हापूरमधील माध्यमांमध्येही त्यांच्या जाण्याने हळव्यक्त होत आहे.