कोरोना काळात गंगापूरच्या राजर्षी शाहू विकास मंचने जपली सामाजिक बांधिलकी
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण चे आमदार ऋतुराज पाटील आणि गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांच्या कार्यालयाचे जन संपर्क अधिकारी डी डी पाटील यांच्या
वाढदिवसाचे औचित्य साधून भुदरगड तालुक्यातील गंगापूरच्या राजर्षी शाहू विकास मंचाच्या वतीने ” माझा वाढ दिवस कोरोना योध्यासाठी” हा उपक्रम राबविण्यात आला .त्यानुसार गंगापूर गावातील कोरोना योध्याचा सत्कार जीवनावश्यक वस्तू आणि वाफेचे मशीन देऊन करण्यात आला .कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला .सतेज पाटील प्रेमी कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला .गंगापूर ग्रामपंचायत कर्मचारी आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक चव्हाण,श्रीमती कुंभार यांचा कोरोना काळातील योगदानाबद्दल गौरव करण्यात आला .कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सचिन घोरपडे, डी डी पाटील यांचाही या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.यावेळी माजी पोलीस पाटील दौलत पाटील, उपसरपंच सुरेश ढेकळे, संतोष पाटील,अमोल पाटील,उदय पाटील, बाळासाहेब पाटील, शिवाजी लोकरे, यांच्यासह राजर्षी शाहू विकास मंच चे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .